ETV Bharat / entertainment

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कथित गर्लफ्रेंड लारिसा बोनेसी झाले मुंबईतील कार्यक्रमात स्पॉट... - ARYAN KHAN WITH GF LARISSA BONESI - ARYAN KHAN WITH GF LARISSA BONESI

SRK's Son Aryan Khan and Rumoured GF : आर्यन खान रविवारी मुंबईतील एका कार्यक्रमात दिसला. यानंतर थोड्या वेळानं, त्याची कथित गर्लफ्रेंड लारिसा बोनेसी देखील तिच्या मित्रांसह तिथे हजर झाली. आता सोशल मीडियावर आर्यन हा लारिसाबरोबर नात्यात असल्याच्या चर्चा आहेत.

SRK's Son Aryan Khan and Rumoured GF
शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि कथित गर्लफ्रेंड (Aryan Khan and his Rumoured Gf Larissa Bonesi (ANI/ Larissa Bonesi Instagram handle))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 4:08 PM IST

मुंबई - SRK's Son Aryan Khan and Rumoured GF : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं चित्रपटसृष्टीत पदार्पण दिग्दर्शक म्हणून केलंय. 'स्टारडम' ही वेब सीरीज आर्यननं लिहिली आहे. आता सीरीजचं शूटिंग पूर्ण झालंय. प्रोफेशनल लाइफबरोबर आर्यन हा त्याच्या पर्सनल लाईफबद्दलही चर्चेत असतो. आर्यन ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लारिसा बोनेसीला डेट करत असल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत. तिला सेलिब्रिटींबरोबर आणि अनेक कार्यक्रमांमध्ये पाहिले गेले आहे, जिथे आर्यन देखील उपस्थित असतो. आता पुन्हा एकदा कथित गर्लफ्रेंड लॅरिसानं रविवारी रात्री एका कार्यक्रमात हजेरी लावली जिथे आर्यनहा उपस्थित होता. या कार्यक्रमात या दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लॅरिसा बोनेसी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती.

आर्यन खानची कथित गर्लफ्रेंड : आता सोशल मीडियावर पापाराझीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दोघेही कार्यक्रमस्थळी असल्यातचं दिसत आहे, मात्र त्याचा एकत्र असण्याचा व्हिडिओ हा समोर आलेला नाही. आता अनेकजण लारिसा बोनेसी ही आर्यनची गर्लफ्रेंड असल्याचं म्हणत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आर्यन खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. दरम्यानं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही एकमेकांना डेट करण्याबाबत काहीही सांगितलेलं नाही.

पार्टीत सोहेल खानचा मुलगाही झाला स्पॉट : सोहेल खानचा मुलगा निरवान खाननं देखील या पार्टीला हजेरी लावली. त्याच्याबरोबर अभिनेता लक्ष्य आणि राघव जुयालही एकत्र दिसले. आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' या वेब सीरीजला रेड चिलीज एंटरटेनमेंट तयार करत आहे. या वेब सीरीजच्या कहाणीत ग्लॅमरस आणि अशांत जगाचे दर्शन घडणार आहे. यात लक्ष्य लालवानी, बॉबी देओल आणि मोना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सीरीजमध्ये शाहरुख खान, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे कॅमिओ भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या या सीरीजची रिलीज डेट समोर आलेली नाही, मात्र लवकरच याबद्दलची घोषणा होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.