मुंबई - Jawan in Japan : शाहरुख खान अभिनित 'जवान' चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्यावर्षी हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. जगभरात रिलीज झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर, 'जवान'नं जपानमध्ये रिलीजची तारीख निश्चित केली आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस जपानमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज, 3 जुलै रोजी शाहरुख खानच्या एका चाहत्यानं त्याच्या अधिकृत अकाऊंटवर 'जवान'चे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर जपानी भाषेतील आहे. या पोस्टरद्वारे असे सांगण्यात आले आहे की, 'जपान'मध्ये 'जवान'चं आगाऊ बुकिंग 5 जुलैपासून सुरू होईल.
Get your popcorn READY, Japan! 💥 The biggest cinematic event of the year is here! #Jawan is all set to release in Japan on November 29, 2024! It's time to sit back, relax, and let the adventure begin! 🎥🌟@iamsrk @Atlee_dir @RedChilliesEnt #ShahRukhKhan #SRK #Atlee #Jawan… pic.twitter.com/RvdKMd1Iv5
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) July 3, 2024
'जवान' चित्रपट होईल जपानमध्ये रिलीज : 'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शनं साऊथ दिग्दर्शक ॲटलीनं केलय. शाहरुख खानचा हा चित्रपट अनेकांना पसंत पडला होता. शाहरुखची जपानमध्ये देखील फॅन फॉलोईंग खूप आहे. सध्या जपानमधील चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट खूप आतुरतेनं पाहात आहेत. सध्या, 'जवान' यूएस $47.60 दशलक्ष कमाईसह परदेशात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आहे. याशिवाय यूएस $47.85 दशलक्ष कमाई करत 'पठाण'ला देखील मागे टाकले आहे. आता जपानमध्ये देखील 'पठाण'ला मागे टाकण्याचे 'जवान'चे लक्ष्य असेल.
Bollywood Industry Hit & Highest Grosser of 2023 #Jawan to release in Japan on 29th November 2024. pic.twitter.com/LXXz2PVqZq
— Nishit Shaw (@NishitShawHere) July 3, 2024
'जवान' चित्रपटामधील स्टार कास्ट : 'जवान' चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्माद्वारा निर्मित केला गेला होता. या चित्रपटाचा रनटाईम हा 2 तास 49 मिनिट आहे. 'जवान' चित्रपटात 'किंग खान'बरोबर साऊथ अभिनेत्री नयनतारा ही मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेता विजय सेतुपतीनं खलनायकाची भूमिका साकारली होती. तसंच 'जवान'मध्ये सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोव्हर, गिरिजा ओक, योगी बाबू, इजाज खान, अश्लेशा ठाकूर, संजीता भट्टाचार्य, संजय दत्त आणि इतर कलाकरांनी उत्तम अभिनय केला आहे. दरम्यान शाहरुख खान वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'लॉयन', 'जवान 2' आणि 'टायगर वर्सेस पठान ' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा :
- सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "जे लग्नाच्याबाबत आनंदी.." - SHATRUGHAN SINHA
- रणवीर सिंगनं कुटुंबासहित पाहिला 'कल्की 2898 एडी', पत्नी दीपिकाकरिता शेअर केली पोस्ट - ranveer singh and deepika padukone
- श्रद्धा कपूरनं लखनौमध्ये चाहत्यांना मिठी मारून घेतली भेट, सोशल मीडियावर नेटिझन्सनं केलं कौतुक - shraddha kapoor