ETV Bharat / entertainment

आर्यन खान-लॅरिसा बोन्सी आणि सुहाना-अगस्त्य नंदा हे कथित कपल्स मुंबईमधील इव्हेंटमध्ये झाले स्पॉट - aryan and suhana khan - ARYAN AND SUHANA KHAN

Aryan and Suhana Khan: शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना खान यांनी अलीकडेच मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात आर्यनची कथित गर्लफ्रेंड ब्राझिलियन अभिनेत्री लॅरिसा बोन्सी देखील उपस्थित होती. याशिवाय सुहानाचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदा देखील या कार्यक्रमात स्पॉट झाला.

Aryan and Suhana Khan
आर्यन आणि सुहाना खान (आर्यन खान, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 11:31 AM IST

मुंबई -Aryan and Suhana Khan: अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याची बहीण सुहाना खान रविवारी 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दोन्ही स्टार किड्सनं त्यांच्या स्टायलिश लूकनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात ब्राझिलियन अभिनेत्री लॅरिसा बोन्सी आणि अमिताभ बच्चन यांचा नातू-अभिनेता अगस्त्य नंदा हा देखील उपस्थित होता. आर्यन खान-लॅरिसा बोन्सी आणि सुहाना-अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याच्या सध्या चर्चा आहेत. या कार्यक्रमाला पोहोचलेल्या पापाराझींनी स्टार किड्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आर्यन आणि सुहानाचा स्टायलिश अंदाज : आर्यन आणि सुहाना स्टायलिश लूकमध्ये खूप आकर्षक दिसत होते. कॅज्युअल ब्लॅक प्रिंटेड टी-शर्ट, जीन्स आणि डेनिम जॅकेटमध्ये आर्यन हा देखणा दिसत होता. तर, सुहानानं बॉडी-हगिंग मॅक्सी आउटफिट परिधान केली होती. आर्यनला डेट करत असल्याची चर्चा असलेली ब्राझिलियन अभिनेत्री लॅरिसा बोन्सीनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला , तर सुहानाचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदानं पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. 'द आर्चीज'मध्ये एकत्र दिल्यानंतर सुहाना आणि अगस्त्यचं नातं खूप चर्चेत आलं होतं. आर्यनबद्दल अधिक सांगायचं झालं तर, त्याची कथित गर्लफ्रेंड तो ज्या कार्यक्रमात जातो तिथे ती हजर राहते.

आर्यन आणि सुहानाचं वर्कफ्रंट : आर्यन, सुहाना, लॅरिसा आणि अगस्त्य यांच्यातील नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरूचं आहेत. या स्टार किड्सनं अफवांवर सार्वजनिकपणे भाष्य केलेलं नाही. दरम्यान त्याच्या व्हायरल व्हिडिओवर अनेक कमेंट्स करून त्यांना त्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा भाचा निर्वाण खान आणि करण जोहरच्या 'किल' चित्रपटात काम केलेला लक्ष्य लालवानी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान सुहाना लवकरच 'किंग' या चित्रपटामध्ये वडील शाहरुख खानबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे आर्यन खाननं 'स्टारडम' या वेब सीरीजचं दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा :

  1. दिल्लीत आई गौरी खानचं बालपण गेलेल्या घराची आर्यन खाननं केली खरेदी, इतक्या कोटीला झाली डील - Aryan Khan bought house
  2. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कथित गर्लफ्रेंड लारिसा बोनेसी झाले मुंबईतील कार्यक्रमात स्पॉट... - ARYAN KHAN WITH GF LARISSA BONESI
  3. शाहरुख खाननं आपल्या कुटुंबासह फराह खानची आई मेनका इराणी यांना वाहिली श्रद्धांजली, व्हिडिओ व्हायरल - Farah Khan Mother death

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.