मुंबई - साऊथ सुपरस्टार सूर्या साऊथ सिनेमाचा 'गजनी' आणि 'सिंघम' म्हणून खूप प्रसिद्ध आहे. आमिर खानचा 'गजनी' हा सूर्याच्या चित्रपटाचा रिमेक आहे. सूर्याचं नाव साऊथ इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय असून त्याला चित्रपटामध्ये कधीही यायचं नव्हत. त्याला वडील शिवकुमार यांच्यापासून वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. त्यानं एका गारमेंट कारखान्यात सुरुवातीला फक्त 736 रुपये पगारावर काम केलं. त्याला स्वतःची कंपनी सुरू करायची होती. सूर्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'मला फॅक्टरीमधील काम कंटाळवाणे वाटू लागले, दरम्यान मणिरत्नम सरांनी मला पाहिले आणि फोटोशूट करण्यास सांगितलं. त्यांनी माझे फोटो पाहिले आणि त्यांनी मला 'नेरुक्कु नेर' ऑफर केली.' सूर्याचा हा पहिला चित्रपट होता. 'नंदा' या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यानं 'पिथगमन', 'पेराझागन', 'गजनी' आणि 'सिंघम' असं चित्रपट केले. आज त्याची गणना मोठ्या सुपरस्टारच्या यादीत केली जाते. 'गजनी' आणि 'सिंघम'चा हिंदीमध्ये रिमेक आला होता, जो बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.आज सूर्याची एकूण संपत्ती 350 कोटी रुपये आहे.
शाहरुख खान : भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चेहरे शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सामंथा रुथ प्रभू यांनीही अशाच पद्धतीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. बॉलिवूडमध्ये शाहरुख खानला आउटसाइडर म्हटले जाते, कारण त्यानं बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःच्या मेहनतीनं नाव कमावलं आहे. आज शाहरुख खानची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी 'किंग खान'नं पंकज उदास यांच्या संगीत मैफलीत व्यवस्थापक म्हणून काम केलं होतं. त्याला इथे 50 रुपये मानधन मिळत होते. हे पैसे घेऊन शाहरुख ताजमहाल पाहण्यासाठी गेला होता. यानंतर त्यानं टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. शाहरुखचा 'दिवाना' पहिला चित्रपट होता.
सामंथा रुथ प्रभू : याशिवाय सोशल मीडियावर सामंथानं चाहत्यांशी संवाद साधताना सांगितलं होतं की, तिचा पहिला पगार 500 रुपये होता. एका हॉटेलमध्ये कॉन्फ्रेंसदरम्यान होस्टेस म्हणून काम करत होती. त्यावेळी ती दहावीत होती, 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ये माया चेसावा' या चित्रपटातून समांथानं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. समांथा आज साऊथ चित्रपटसृष्टीमधील खूप मोठ नाव आहे. तिची एकूण संपत्ती 101 कोटी रुपये आहे.
अक्षय कुमार : अक्षय कुमारचा पहिला पगार 150 रुपये होता. तो कोलकात्यात एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करत होता. यानंतर त्यानं इतर छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांचा पहिला चेक 5000 रुपयांचा होता. अक्षयला 'दीदार' या चित्रपटातून ब्रेक मिळाला ज्यासाठी त्यानं 50 हजार रुपये घेतले होते.