ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुननं दिवाळीच्या मुहूर्तावर 'पुष्पा 2'मधील नवीन पोस्टर केलं रिलीज, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मधील नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये अल्लू अर्जुनबरोबर रश्मिका मंदान्ना दिसत आहे.

pushpa 2
पुष्पा 2 (पुष्पा 2 द रूल पोस्टर (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 2 hours ago

मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2' या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर दाखल होईल. आज दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. आता चाहते चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर बारीक नजर ठेवून आहेत. यापूर्वी देखील या चित्रपटामधील अनेक धमाकेदार पोस्टर आणि गाणी रिलीज झाली आहेत.

'पुष्पा 2 द रुल:'मधील नवीन पोस्टर रिलीज : आज दिवाळीच्या मुहूर्तावर 'पुष्पा 2'चं नवीन पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता अनेकजण खुश आहेत. काहीजण या पोस्टरच्या पोस्टवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अल्लू अर्जुननं गुरुवारी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत 'हॅपी दिवाळी' असं लिहिलं आहे. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनबरोबर रश्मिका मंदान्ना देखील दिसत आहे. आता या पोस्टच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं, 'आमच्या आवडत्या हिरोला दिवाळीच्या शुभेच्छा.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'पुष्पा 2 ब्लॉकबस्टर असेल. आणखी एकानं लिहिलं, 'अण्णा, तुम्ही दिवाळीला परफेक्ट गिफ्ट दिलं आहे, अतिशय सुंदर पोस्टर आहे.'

पुष्पा 2 द रुल: चित्रपटाबद्दल : 'पुष्पा 2 द रुल:' चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या व्यतिरिक्त फहद फासिल, श्रीतेज, प्रियामणी, अनुसया भारद्वाज, जगपती बाबू , प्रकाश राज आणि सुनील हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 500 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट तेलुगू , तामिळ, बंगाली, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये या भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान एका रिपोर्टनुसार 'पुष्पा 2'मधील आयटम साँगमध्ये श्रद्धा कपूर दिसणार आहे. अल्लू अर्जुन आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' जगभरात 11500 स्क्रीन्सवर ग्रँड रिलीजसह करणार धमाका...
  2. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'ला मिळाली नवीन रिलीज डेट, जाणून घ्या कधी येईल पडद्यावर
  3. 'पुष्पा 2'मध्ये 'ॲनिमल' स्टारनं केली एन्ट्री, अल्लू अर्जुनच्या चित्रपटात होईल धमाका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.