मुंबई Sonu Nigam Birthday : गायक सोनू निगमच्या आवाजाची जादू आजही लोकांवर आहे. सोनू निगम हा 90च्या दशकातील पहिला गायक आहे, जो सर्व प्रकारची गाणी गात होता. आजही सोनूच्या म्यूजिक कन्सर्टमध्ये हजारो चाहते जमतात. सोनू निगम आज 30 जुलै रोजी 51 वर्षांचा झाला आहे. या विशेष प्रसंगी त्याचे चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सोनू निगमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत त्याची टॉप 5 रोमँटिक गाणी, जी तुम्ही मॉन्सूनमध्ये ऐकून स्वत:चे मनोरंजन करू शकता.
'मैं अगर कहूं' : 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'मैं अगर कहूँ' हे रोमँटिक गाणं खूपच लोकप्रिय आहे. सोनू निगमच्या गोड आवाजातील गाणं आजच्या पिढीतील तरुणाईमध्येही खूप लोकप्रिय आहे. शाहरुख खाननं 'मैं अगर कहूँ'मध्ये पहिल्यांदा दीपिका पदुकोणबरोबर काम केलं होतं.
'तुम ही देखों ना' : 'कभी अलविदा ना कहना' चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट आहेत. या चित्रपटामधील राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित केलेल्या 'तुम्ही देखो ना' हे गाणं सोनू निगमनं गायलं असून ऐकून तुम्हाला आनंद मिळेल.
'सूरज हुआ मद्धम' : सोनू निगमचा हा रोमँटिक ट्रॅक विसरणं फारचं कठीण आहे. करण जोहर आणि शाहरुख खानच्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील 'सूरज हुआ मद्धम' हे गाणं अजूनही रोमँटिक ट्रॅकमध्ये वरच्या स्थानावर समाविष्ट केलं जातं. शाहरुख आणि काजोलची रोमँटिक जोडी या चित्रपटानंतर खूप लोकप्रिय झाली होती.
'सतरंगी रे' : 'दिल से' चित्रपटातील 'सतरंगी रे' हे गाणं खूप लोकप्रिय आहे. यामध्ये सोनू निगमचं गायन त्याचबरोबर शाहरुख आणि मनिषा कोईराला यांचा डान्स हा अनेकांना आवडला होता.
'तुमसे मिलके दिल का' : 'मैं हूँ ना' या चित्रपटात सोनू निगमनं शाहरुख खानसाठी 'तुमसे मिलके दिल का..' गाणं गायलं आहे. हे गाणं रोमँटिक आणि दमदार आहे. फराह खान दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान हा माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनबरोबर रोमान्स करताना दिसला होता.
हेही वाचा :
- शाहरुख खाननं आपल्या कुटुंबासह फराह खानची आई मेनका इराणी यांना वाहिली श्रद्धांजली, व्हिडिओ व्हायरल - Farah Khan Mother death
- अबराम आणि गौरीबरोबर लंडनहून परतताच विमाीनतळावर दिसला शाहरुख खानचा रुबाब - Shah Rukh Khan news
- ग्रेविन म्युझियम पॅरिसनं शाहरुख खानच्या सन्मानार्थ जारी केलेल्या सोन्याच्या नाण्याची पोस्ट पुन्हा व्हायरल - Grevin Museum Paris