मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध आहे. ती अनेकता सोशल मीडियाच्या माध्यामातून आपले मत मांडताना दिसते. अलीकडेच सोनाक्षीनं टीव्ही अभिनेता आणि लोकप्रिय सुपरहिरो शो 'शक्तिमान' फेम अभिनेता मुकेश खन्ना यांना मर्यादेत राहण्यास सांगितलं आहे. मुकेश खन्ना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. 'केबीसी 16'मध्ये हनुमानाबद्दल उत्तर न दिल्याबद्दल मुकेश खन्ना यांनी पुन्हा एकदा सोनाक्षीला चांगलच सुनावलं. आता सोनाक्षीनं यावर सोशल मीडियाच्या माध्यामातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. नुकतीच सोनाक्षी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या शो 'कौन बनेगा करोडपती सीझन 16'मध्ये पोहोचली होती.
सोनाक्षी सिन्हानं मुकेश खन्नाला सुनावलं : दरम्यान सोनाक्षी सिन्हानं आपल्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं, 'मी नुकतेच मुकेश खन्नाजी यांचे एक विधान वाचले होते, ज्यात त्यांनी माझ्या रामायणाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर न दिल्यानं, माझ्या वडिलांची चूक असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी हॉट सीटवर मी एकटीच नव्हती, तिलाही याचं उत्तर माहित नव्हतं, पण तुम्ही माझं नाव घेतलं. मला माझी चूक मान्य आहे. मला असे वाटते की तुम्ही प्रभू रामानं शिकवलेले धडे विसरलात, तुम्ही कोणालाही माफ करायला पाहिजे. जर प्रभु राम मंथराला माफ करू शकतो, तर ते कैकेलाही माफ करू शकतात. इतकेच नाही त्यांनी शेवटी रावणालाही माफ केलं होतं. याचा अर्थ असा नाही होत की, मी माफी मागितली पाहिजे.'
मुकेश खन्नानं केलं विधान : आता सोनाक्षीनं मुकेश खन्ना यांना इशारा देत पुढं म्हटलं की, 'पुढच्या वेळी माझ्या पालनपोषणावर भाष्य करू नका. लक्षात ठेवा की, त्या पालनपोषणामुळेच मी तुम्हाला आदरपूर्वक उत्तर दिलं आहे.' मुकेश खन्ना यांनी याआधी म्हटलं होत की, 'जर मी ताकदवान असतो, तर मी आजच्या मुलांना भारतीय संस्कृतीबद्दल सांगितलं असतं, मला माहित नाही की शत्रुघ्ननं आपल्या मुलांना ते का शिकवले नाही.' यानंतर मुकेश खन्ना खूप चर्चेत आले. यापूर्वी देखील मुकेश खन्नानं अनेकदा वादग्रस्त विधान केलं आहेत.
हेही वाचा :
- दिवाळीनिमित्त करीना कपूर खान ते सोनाक्षी सिन्हापर्यंत बी टाउन सेलेब्सनं दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पोस्ट व्हायरल
- सोनाक्षी सिन्हानं पती झहीर इक्बालबरोबरचा फोटो केला शेअर, चाहत्यांनी दिल्या प्रेग्नन्सीसाठी शुभेच्छा
- सोनाक्षी सिन्हानं लग्नानंतर पहिल्यांदा केला रॅम्प वॉक, बार्बी डॉलचं लूक व्हायरल - Sonakshi Sinha