ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी मनीषा कोईरालानं पाठवली खास भेटवस्तू - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अलीकडेच अभिनेत्री मनीषा कोईरालानं तिच्या सोनाक्षीला एक मोठी भेट पाठवली आहे. या भेटीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं लग्न (सोनाक्षी सिन्हा-मनीषा कोइराला (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 12:37 PM IST

मुंबई - Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या मुंबईतील 'रामायण' या घरामध्ये सध्या बरेच काही घडत आहे. गेल्या शनिवारी 22 जून रोजी सोनाक्षीच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षीची आई पूनम सिन्हाबरोबर पूजेला हजर होती. 'हिरामंडी'ची को-स्टार मनीषा कोईरालानं सोनाक्षीच्या लग्नानिमित्त एक मोठी भेट आणि पुष्पगुच्छ पाठवला. सोनेरी चमकदार रंगीत गिफ्टिंग पेपरमध्ये गुंडाळलेली ही भेटवस्तू एका व्यक्तीनं आणून दिली, असल्याचं एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. मनीषा कोईरालानं पाठवलेली भेटवस्तू खूप मौल्यवान असेल, असा अंदाज अनेकजण व्हिडिओ पाहून लावत आहेत.

सोनाक्षी सिन्हाचे फोटो व्हायरल : सोनाक्षीच्या घरी झालेल्या पूजेचं फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पवित्र प्रसंगी तिनं निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. व्हिडिओमध्ये सोनाक्षीच्या चेहऱ्यावर चमक दिसत आहे. ती आईबरोबर पूजास्थळी जाताना दिसली. तिनं पापाराझींसाठी एक क्यूट पोझही दिली. सात वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी आणि झहीर आज विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर हे कपल मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या आलिशान रेस्टॉरंट बास्टनमध्ये सेलिब्रेशन करणार आहे. या कार्यक्रमात हुमा कुरेशी, साकिब सलीम, आयुष शर्मा, 'हिरामंडी' कलाकारांसह अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात.

लग्नाची लगबग : याआधी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या होत्या. याशिवाय तिच्या लग्नाबद्दल तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आलं होतं. मात्र त्यांना या लग्नाबद्दल माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'हिरामंडी' या वेब सीरीजमध्ये दिसली होती. तिची ही वेब सीरीज खूप गाजली होती. आता पुढं ती 'हाऊसफुल्ल 5' आणि 'निकिता रॉय और द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'या' स्पर्धकांनी केली एंट्री, देवोलीना भट्टाचार्यनं 'हा' घेतला आक्षेप - bigg boss ott season 3
  2. सलमान खान गोळीबार प्रकरण; फॉरेन्सिक अहवालात 'ही' धक्कादायक माहिती आली समोर - Salman Khan Firing Case
  3. आमिर खानचा मुलगा जुनैदनं 'महाराज' चित्रपटातून केलं पदार्पण, बहीण इरा आणि मेव्हणा नुपूरची प्रतिक्रिया - Maharaj release

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.