ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हानं पती झहीर इक्बालबरोबरचा फोटो केला शेअर, चाहत्यांनी दिल्या प्रेग्नन्सीसाठी शुभेच्छा - SONAKSHI SINHA

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये सोनाक्षीला तिचे चाहते प्रेग्नंट असल्याचं विचारताना दिसत आहेत.

sonakshi sinha
सोनाक्षी सिन्हा (सोनाक्षी सिन्हा (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 28, 2024, 1:23 PM IST

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 रोजी विवाह केला. झहीर-सोनाक्षीच्या लग्नात फक्त कुटुंब आणि काही मित्र उपस्थित होते. लग्नानंतर सोनाक्षी दोनदा हनीमूनलाही गेली. सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालबरोबर तिच्या नवीन वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. हे जोडपे बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्येही दिसतात. अलीकडे सोनाक्षी आणि झहीर एका दिवाळी पार्टीत दिसले. आता सोनाक्षीनं 28 ऑक्टोबरला पती बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट आहे का? : या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूप खास दिसत आहे. दुसरीकडे झहीर ब्लॅक अँड व्हाइट कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी आणि झहीर एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोत सोनाक्षी एका छोट्या श्वानला आपल्या हातात पकडून आहे. या फोटोच्या कॅप्शनध्ये सोनाक्षीनं लिहिलं,'गेस द पूकी.' आता सोनाक्षीनं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'लवकरच एक छोटी सोना येईल .' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'प्रेग्नंट आहे का ?' आणखी एकानं लिहिलं, 'सोनाक्षी प्रेग्नंट आहे.' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

सोनाक्षी सिन्हाचं वर्कफ्रंट : आता सोशल मीडियावर सोनाक्षीचा फोटो पाहूण अनेकजण ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या बातम्या जोर पकडत आहेत. सोनाक्षी अनेकदा सोशल मीडियावर आपल्या पतीबरोबर रिल शेअर करून चर्चेत असते. दरम्यान सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'हाऊसफुल्ल 5'मध्ये अक्षय कुमार आणि रितेश देशमुखबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण मनसुखानी करणार आहेत. याशिवाय तिचा ' निकिता रॉय आणि द बुक ऑफ डार्कनेस' या चित्रपटामध्ये देखील ती झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हानं लग्नानंतर पहिल्यांदा केला रॅम्प वॉक, बार्बी डॉलचं लूक व्हायरल - Sonakshi Sinha
  2. शत्रुघ्न सिन्हांच्या खोलीत शिरताना भीतीनं थरथरत होता झहीर इक्बाल, मुलाखतीत शेअर केला प्रपोजचा किस्सा - Zaheer Iqbal
  3. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईहून अज्ञातस्थळी हनिमूनसाठी रवाना - SONAKSHI SINHA AND ZAHEER IQBAL

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.