ETV Bharat / entertainment

सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन स्टारर 'युध्रा'मधील 'सोहनी लगदी' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - siddhant chaturvedi - SIDDHANT CHATURVEDI

Sohni Lagdi Song : सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन अभिनीत 'युध्रा'मधील 'सोहनी लगदी' गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात सिद्धांत आणि मालविकामधील सुंदर केमिस्ट्री दिसत आहे.

Sohni Lagdi Song
सोहनी लगदी (सिद्धांत चतुर्वेदी (Song Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 6:20 PM IST

मुंबई Sohni Lagdi Song : सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन 'युध्रा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटामधील बहुप्रतीक्षित क्लब अँथम 'सोहनी लगदी' हे गाणं 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये सिद्धांत आणि मालविका यांची जोडी खूपच अप्रतिम असल्याचं दिसत आहे. आता हा ट्रॅक अनेकांना आवडत आहेत. 'सोहनी लगदी' हे बीट्स आणि फंकी लयसह कोणत्याही पार्टीमध्ये ऊर्जा भरून देण्यासाठी एकदम योग्य गाणं असणार आहे. सिद्धांत आणि मालविका यांनी गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. या गाण्याचा कोरिओग्राफर हा बॉस्को मार्टिस आहे.

'युध्रा' चित्रपटामधील 'सोहनी लगदी' गाणं : सिद्धांत आणि मालविका यांनी आपल्या धमाकेदार परफॉर्मेंसनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. या गाण्याला प्रेम आणि हरदीप यांनी संगीतबद्ध केलं आहे. याशिवाय जाझ धामी आणि सोना रेले यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यात दमदार बीट्स आणि राज रणजोध यांचे आकर्षक बोल आहेत.'युध्रा' या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केलं आहे. एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी 'युध्रा' चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'युध्रा' चित्रपटाबद्दल : 'युध्रा' या चित्रपटामधील स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये गजराज राव, राम कपूर, राज अर्जुन आणि राघव जुयाल यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान 'युध्रा' चित्रपटाची घोषणा 15 फेब्रुवारी 2021 रोजी सोशल मीडियावर करण्यात आली होती. या चित्रपटाचा ट्रेलर 29 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज झाला होता, तेव्हापासूनच या चित्रपटाची चाहते खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. सिद्धांत या चित्रपटात सिद्धांत एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. तसेच सिद्धांतच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 'इनसाइड एज' या वेब सीरिजमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर त्यानं 'गली बॉय ' चित्रपटात रॅपरची भूमिका साकारली होती. या चित्रपचटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यानं दीपिका पदुकोणबरोबर 'गहराइयाँ' या चित्रपटामध्ये काम केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.