मुंबई: अभिनेता अजय देवगणचा 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' दिवाळीला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहेत. हे दोन्ही चित्रपट 1 नोव्हेंबरला एकत्र रिलीज होणार आहेत. दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे, आता दोन्ही चित्रपटांमध्ये 19-20% फरक आहे. 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'च्या स्क्रीन स्पेसमध्ये सध्या 60-40चं प्रमाण आहे. त्यानुसार 'सिंघम अगेन'ला अधिक स्क्रीन्स मिळत आहेत. मात्र, कुठला चित्रपट पुढं आहे, हे रिलीजच्या पहिल्या दिवशीच कळेल. चला तर मग जाणून घेऊया आगाऊ बुकिंग.
'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3'चं ॲडव्हान्स बुकिंग : दोन्ही चित्रपटांच्या आगाऊ बुकिंगबद्दल सांगायचं झालं तर, 'भूल भुलैया 3'चे आगाऊ बुकिंग 'सिंघम अगेन'च्या एक दिवस आधी सुरू झाले होते. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 'भूल भुलैया 3'नं सुमारे 8700 शोमधून 7.50 कोटी रुपयांची आणि 2 लाख 35 हजार तिकिटांची विक्री झाली. 'सिंघम 3'नं पहिल्या दिवशी सुमारे 11,700 शोमधून 6.15 कोटी रुपयांची आणि 1 लाख 89 हजार तिकिटे विकली.
बॉक्स ऑफिसचा अंदाज : अजय देवगणच्या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन जवळपास 35 कोटी आणि 'भूल भुलैया 3 'चे जवळपास 23-25 कोटी असेल असे ट्रेड तज्ज्ञांचं मत आहे. दोन्ही चित्रपटांचे निर्माते मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी अधिक स्क्रीन्सची मागणी, करत असल्यानं स्क्रीन शेअरिंगबाबत बरीच भांडणे होत आहेत.
'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' : पूर्ण बुकिंग सुरू झाल्यानंतर, दोन्ही चित्रपटांच्या प्री-सेल्समध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'सिंघम अगेन'चं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं असून यात अजय देवगण, अर्जुन कपूर, करीना कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.
हेही वाचा :