मुंबई -SIIMA Awards 2024 : साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) त्याच्या 12 व्या आवृत्तीसह साऊथ सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज आहे. हा अवार्ड शो जगभरातील चाहत्यांना साऊथ स्टार्सशी जोडते. अलीकडेच त्याचे नामांकन आणि त्याच्याशी संबंधित माहिती समोर आली आहे. हा पुरस्कार सोहळा देशात नाही तर परदेशात होणार आहे. गेल्या मंगळवारी 16 जुलै रोजी साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA)नं नामांकनांची घोषणा केली. यात चार भाषांमधील चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यंदा सायमा 14 आणि 15 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. 'दशहरा' (तेलुगू), 'जेलर' (तमिळ), 'लिओ' (तमिळ), 'काटेरा' (कन्नड), '2018' (मल्याळम) हे चित्रपट सायमा नामांकनांमध्ये आघाडीवर आहेत.
तमिळ सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन आहेत...
1: जेलर
२: लिओ
3: मामन्नन
३: पोन्नियिन सेलवन 2
५: विदुथलाई 1
तेलुगू सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन आहेत...
1: बालागम
2: बेबी
3: भगवंत केसरी
4: दशहरा
5: हाय नन्ना
6: विरुपाक्ष
कन्नड सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन..
1: आचार एंड कंपनी
2: काटेरा
3: कौसल्या सुप्रजा राम
4: क्रांती
5: सप्त सागरदाचे एलो - साइड ए
मल्याळम सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन...
1: इरत्ता
2: कैथल द कोर
3: नानपाकल नेरथु मयक्कम
4: नेरू
5: 2018
सायमा 2024 प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता तेलुगू
1: बालकृष्ण - भगवंत केसरी
2: चिरंजीवी कोनिडेला - वाल्टेयर वीरय्या
3: धनुष - सर
4: नानी - दशहरा
5: साईं दुर्गा तेज - विरुपाक्ष
सायमा 2024 प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता कन्नड
1: दर्शन थुगुदीपा श्रीनिवास - काटेरा
2: डाली धनंजय - गुरुदेव होयसला
3: राज बी शेट्टी - टोबी
4: रमेश अरविंद - शिवाजी सुरथकल 2
5: रक्षित शेट्टी - सप्त सागरदाचे एलो साइड ए
6: राजकुमार- घोस्ट
सायमा 2024 प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता तमिळ
1: रजनीकांत - जेलर
2: शिवकार्तिकेयन दोस - मावीरन
3: सिद्धार्थ - चिट्ठा
4: उदयनिधि स्टालिन - मामन्नन
5: विक्रम - पोन्नियिन सेलवन 2
6: विजय- लियो
सायमा 2024 प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता - मल्याळम
1: बेसिल जोसेफ - फालिमी आणि कदीना कदोरामी अंदकदहमसाठी
2: जोजू जॉर्ज - इरट्टा
3: मोहनलाल- नेरू
4: ममूटी - नानपाकल नेरथु मयक्कम, कैथल द कोर आणि कन्नूर स्क्वाड
5: सुरेश गोपी - गरुडन
6: टोविनो थॉमस - 2018