मुंबई - अभिनय करणे ही सोपी गोष्ट अजिबात नाही. यासाठी अनेकदा कलाकारांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आवश्यक ठरतं. अनेकवेळा संवाद, इमोशनल सीन्स, याशिवाय त्यांना स्टंटही करावे लागतात. यासाठी अनेकजण आपल्या बॉडी डबलची मदत घेतात. आता एक्स या सोशल मीडिया हँडलवर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं खुलासा केलाय की, 'वॉर' चित्रपटामधील प्रसिद्ध कार चेस सीक्वेन्स हा मुख्य अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनी स्वतः केला होता.
सध्या सोशल मीडियावर एका बातमीचे खूप जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये 'वॉर' चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ क्लायमॅक्स सीनचा अनुभव सांगताना दिसतात. या सीन्सच्या वेळी हृतिक आणि टायगरनं दाखवलेल्या धैर्यामुळे सिद्धार्थने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. हा सीन पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खुर्चीवर खिळवून ठेवणारा होता. त्या काळात याची बरीच चर्चा रंगली होती.
याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, मी कलाकारांवर विश्वास ठेवतो कारण दोघांनाही आपल्या सीमारेघा ओलांडून त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन करायला आवडते. त्यात भर टाकून, टायगरने शेअर केले की बर्फाळ भागावर शूट करणे कठीण होते कारण त्याला त्याची कार फिरवताना कॅमेरा आणि क्रू यांच्यापासून सुरक्षित अंतर राखावे लागत होते. 'द डार्क नाइट' सारख्या चित्रपटात काम केलेल्या एलए मधील पॉल जेनिंग्स यांनी या सीनची कोरिओग्राफी केली होती.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात वाणी कपूर, अनुप्रिया गोएंका आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'वॉर'च्या क्लायमॅक्स सीक्वेन्समध्ये, कबीर (हृतिक) आणि खालिद (टायगर) बर्फाळ प्रदेशात त्यांची मोटारगाडी वाहून नेतात, हा प्रसंगही प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवणारा होता.
कामाच्या आघाडीवर, हृतिक आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद तिसऱ्यांदा एरियल अॅक्शन फिल्म 'फायटर'सह पुन्हा कनेक्ट झाले. या चित्रपटात अनिल कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2024 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'वॉर' हा 2019 च्या टॉप चित्रपटांपैकी एक होता.
हेही वाचा -