ETV Bharat / entertainment

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'क्रिश 4'; सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं, 'हो... तो येतोय' - Krrish 4 - KRRISH 4

Krrish 4: चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंद यांनी 'क्रिश 4' चित्रपटावर काम सुरू केल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये हृतिक रोशन पुन्हा सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.

Krrish 4
क्रिश 4 (social media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 7:34 PM IST

मुंबई - Krrish 4 : हिंदी चित्रपटसृष्टीचा देखणा अभिनेता हृतिक रोशननं तीन वर्षांपूर्वी 2021 मध्ये क्रिशच्या चौथ्या भागाबद्दल म्हणजेच 'क्रिश 4'बद्दल अपडेट शेअर केली होती. मात्र, बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाबाबत कोणतीही नवीन अपडेट आलेली नव्हती. मात्र अलीकडेच, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाबद्दल अपडेट शेअर करत क्रिश फ्रेंचायझीच्या चौथ्या चित्रपटाची पुष्टी केली आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. हृतिकला सुपरहिरोच्या लूकमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात आहेत. नुकतेच एका सोशल मीडिया पेजवर क्रिशच्या गेट अपमधील एक पोस्टर शेअर केली आहे.

'क्रिश 4' येणार लवकरच चाहत्यांच्या भेटीला : नवीन पोस्टवर सिद्धार्थ आनंदनं लिहिलं, 'हो, तो येत आहे' यानंतर या पोस्टवर अनेकजण कमेंट शेअर करून आपला आनंद व्यक्त करत आहेत. क्रिश हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक आहे. याआधी देखील एक बातमी समोर आली होती की, राकेश आणि हृतिक 'क्रिश 4' ची तयारी करत आहेत. 'क्रिश 4'ची स्क्रिप्ट लिहिली जात असल्याचं देखील सांगितलं होतं. दरम्यान पुढच्या वर्षी या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याचं टीमचं लक्ष्य असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हृतिक रोशन सध्या 'वॉर 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात साऊथ अभिनेता जूनियर एनटीआर दिसणार आहे. 'वॉर 2' हा चित्रपट 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

हृतिक रोशनचं वर्क फ्रंट : 'क्रिश' फ्रँचायझीमधील सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. आता 'क्रिश 4'मध्ये देखील प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये कुठली अभिनेत्री असणार, याबद्दल आतापर्यंत काहीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान हृतिक रोशनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'फायटर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण, अक्षय ओबेरॉय, अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर, ऋषभ पंत यांसारखे स्टार्स दिसले होते. हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. आता पुढं तो नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. भारतीय संघाला प्रोत्साहन देताना अमिताभ बच्चननं 'अश्वत्थामा'च्या रुपात टी 20 वर्ल्ड कप 2024ची केली घोषणा - Amitabh Bachchan
  2. ईशा देओलनं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 44वा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा - DHARMENDRA HEMA WEDDING ANNIVERSARY
  3. 'इंडियन आयडॉल'च्या स्टेजवर गोविंदानं मुलगा यशबरोबर केला सुंदर डान्स, व्हिडिओ व्हायरल - GOVINDA DANCE VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.