ETV Bharat / entertainment

Shruti Haasan in Toxic : करीना कपूर साऊथ पदार्पणाच्या चर्चेदरम्यान, श्रुती हासनची यश स्टारर 'टॉक्सिक'मध्ये एन्ट्री - Shruti Haasan Joins Toxic Cast

Shruti Haasan Joins Toxic Cast : केजीएफ स्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी श्रुती हासनला साइन करण्यात आलं आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित या चित्रपटातून करीन कपूर खान साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करेल असंही बोललं जात आहे. 'टॉक्सिक' 10 एप्रिल 2025 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Shruti Haasan Joins Toxic Cast
करीना कपूर साऊथ पदार्पण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 2:26 PM IST

मुंबई - Shruti Haasan Joins Toxic Cast : यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटात श्रुती हसनला महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी करारबद्ध करण्यात आलंय. यापूर्वी अभिनेत्री म्हणून साई पल्लवीचे नाव खूप चर्चेत होते तरी निर्मात्यांनी स्टार कस्टबद्दल दुजोरा दिलेला नव्हता. मिळालेल्या लेटेस्ट माहितीवरुन श्रुती हासनला ही भूमिका मिळणार असल्याचे पक्कं समजलं जातंय. तिच्या भूमिकेबद्दलचे तपशील अद्यापही गुलदस्त्यात आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

श्रुती हासनने यापूर्वी 'सालार' चित्रपटामध्ये प्रभासच्या बरोबर काम केलं होतं. असे असले तरी टॉक्सिकमधील तिची भूमिका अजूनही रहस्यमय बनली आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित, 'टॉक्सिक'मध्ये यश मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचा हा 19 वा चित्रपट आहे.

या चित्रपटात करीना कपूर खानदेखील काम करणार असल्याची चर्चा असल्यामुळे सर्वांच्या नजरा 'टॉक्सिक'च्या स्टार कास्टवर वळल्या आहेत. यामुळे या पॅन इंडिया चित्रपटातून करीना कपूर खान साऊथमध्ये पदार्पण करेल असे बोलले जाते. तिच्या आगामी 'क्रू' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, करीनाने तिच्या चाहत्यांना खूप मोठ्या साऊथ चित्रपटात काम करणार असल्याचे संकेत दिले होते. तिने या चर्चेत 'टॉक्सिक'चा उल्लेख केला नसला तरी याच चित्रपटाला उद्देशन तिनं विधान केल्याचं सांगितलं जातं.

केव्हीएन प्रॉडक्शन अंतर्गत वेंकट के नारायणाने 'टॉक्सिक'ची निर्मिती केली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये निर्मात्यांनी "ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स" या टॅगलाइनसह चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, 2022 मध्ये केजीएफ 2 च्या प्रचंड यशानंतर यशचा हा पहिला चित्रपट आहे. पॅन इंडिया स्टार म्हणून यशची वाढती लोकप्रियता पाहता, चाहत्यांमध्ये आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'टॉक्सिक'कडून खूप अपेक्षा बाळगली जात आहे.

या चित्रपटाच्या कथेबद्दलचा तपशील उघड करण्यात आलेला नाही. मात्र हा एक थरारक अ‍ॅक्शन ड्रामा असणार याचे संकेत दिले जात आहेत. यशच्या चाहत्यांनाही हीच अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या चित्रपटाबद्दलचे तपशील उलगडत जातील यासाठी चाहते अपडेट्सवर लक्ष ठेवून राहतील हे नक्की.

हेही वाचा -

Vedaa teaser released : जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया स्टारर 'वेदा'चा टीझर रिलीज

एल्विश यादवच्या आईच्या डोळ्यात अश्रू ; व्हिडिओ व्हायरल

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला लागली भूक, मागितला फ्री पिझ्झा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.