ETV Bharat / entertainment

कोविड लशीचा खरेच दुष्परिणाम होतोय का? श्रेयस तळपदेनं सांगितला अनुभव - Shreyas Talpade

Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदेनं त्याच्या तब्येतीबद्दल सांगितलं की, त्याला नुकताच आलेला हृदयविकाराचा झटका कोविड-19 लसीचा दुष्परिणामांमुळे असू शकतो. याशिवाय त्यानं एका मुलाखतीदरम्यान काही गोष्टीचा खुलासा केला आहे.

Shreyas Talpade
श्रेयस तळपदे ((File Photo- @shreyastalpade27 instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 1:13 PM IST

मुंबई - Shreyas Talpade : 'गोलमाल' फेम अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला होता. आता त्यानं याप्रकरणी एक खुलासा केला आहे. श्रेयसनं अशी शक्यता वर्तवली आहे की, कोविड-19 लसीच्या दुष्परिणामांमुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा. त्यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, तो त्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतो. तरीही त्याला हृदयविकाराचा झटका आला. तब्येतीबद्दल माहिती देताना श्रेयसनं पुढं सांगितलं की, "30 आणि 40 वर्षे वयोगटातील लोकांना हृदयविकाराची तक्रार आहे. तर अनेक लोकांचा अचानक मृत्यूही झाला आहे. मी आता खूप घाबरलो. हे दुर्दैवी आणि अनपेक्षित आहे."

श्रेयस तळपदेची मुलाखत : त्यानं पुढं म्हटलं, "मी माझ्या आरोग्याची काळजी घेत असतो. आता काही लसीबद्दलही सिद्धांत मांडले गेले आहेत. मी अशा लोकांबद्दल ऐकत असतो, जे बाहेर काम करतात. खेळत असतात. त्यांच्याबरोबर काहीतरी घडते. जी व्यक्ती स्वत:बद्दल काळजी घेते, त्यांच्याबरोबर असं काहीतरी घडत आहे. मी धूम्रपान करत नाही. मी नियमितपणे मद्यपान करणारा नाही. मी महिन्यातून एकदा पितो. तंबाखू खात नाही. होय, माझे कोलेस्ट्रॉल थोडेसे वाढले होते. आता ते सामान्य आहे. मी यासाठी औषध घेत होतो. ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. जर मधुमेह नाही, रक्तदाब नाही, तर त्याचे कारण काय असू शकते?"

लस दिल्यानंतर श्रेयसची तब्येत बिघडली : कोविड-19 लसीबद्दल बोलताना त्यानं सांगितलं, " कोविड-19 लसीकरणानंतरच मला थोडा थकवा जाणवू लागला. यात काही प्रमाणात तथ्य आहे. मी हा सिद्धांत नाकारू शकत नाही. कोविड लस संबंधित काही पोस्ट आहेत. हे खूप दुर्दैवी आहे. कारण आपण आपल्या शरीरात काय घेतले आहे, हे आपल्याला खरोखर माहित नाही. आम्ही प्रवाहाबरोबर गेलो.त्या कंपन्यांवर विश्वास ठेवला. कोविड-19 च्या आधी मी अशा घटना ऐकल्या नव्हत्या."

कार्डिॲक अरेस्टबद्दल : श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला तो दिवस आठवला. त्यानं यावर म्हटलं, "मी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. मी एका सीनवर काम करत होतो. ज्यामध्ये मला पाण्यात उडी मारावी लागली होती, यानंतर अस्वस्थ झालो. अचानक मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. माझ्या डाव्या हाताला दुखू लागले. मी जेमतेम माझ्या व्हॅनिटी व्हॅनपर्यंत पोहोचलो. माझे कपडे बदलले. मला काय झाले हे जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबरचे लोक माझ्यापर्यंत पोहोचले. मला काय झाले ते देखील सांगता येत नव्हते.

  • हृदयविकाराचा झटका : 14 डिसेंबर 2023 रोजी श्रेयसला त्याच्या आगामी चित्रपट 'वेलकम टू द जंगल'च्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्याला मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari
  2. वरुण धवन आणि जान्हवी कपूर स्टारर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटाचं शूटिंग सुरू - Sunny Sanskari Ki Tulsi Kumari
  3. कार्तिक आर्यननं 'चंदू चैंपियन'मधील ट्रेलर डबिंगची झलक केली शेअर - Chandu Champion

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.