ETV Bharat / entertainment

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सच्या शर्यतीत श्रद्धा कपूरनं पंतप्रधान मोदींना मागे टाकल्यानंतर प्रियांका चोप्रा आली निशाण्यावर - Shraddha increase followers - SHRADDHA INCREASE FOLLOWERS

Shraddha Kapoor : हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'च्या यशादरम्यान, श्रद्धा कपूरनं इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या शर्यतीत पंतप्रधान मोदी यांना मागे टाकले आहे. आता या शर्यतीत श्रद्धा प्रियांका चोप्राला मागे टाकेल, असं सध्या दिसत आहे.

Shraddha Kapoor
श्रद्धा कपूर (श्रद्धा कपूर इंस्टाग्राम फॉलोअर्स (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 21, 2024, 12:26 PM IST

मुंबई -Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 'स्त्री 2' 15 ऑगस्ट रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. आज 21 ऑगस्टला चित्रपटाचा पहिला आठवडा पूर्ण होत आहे. या चित्रपटानं 6 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'स्त्री 2'च्या यशामुळे श्रद्धा कपूरची लोकप्रियता खूप वाढली आहे. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली असून ती आता इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही पुढे गेली आहे.

श्रद्धा कपूरनं इन्स्टाग्रामवर पंतप्रधान मोदींना मागे टाकले : ' स्त्री 2'च्या यशादरम्यान, श्रद्धा कपूरचं इन्स्टाग्रामवर 91.4 मिलियन चाहते झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांचे इन्स्टाग्रामवर 91.3 मिलियन चाहते आहेत. श्रद्धा कपूरनं फॉलोअर्सच्या शर्यतीत पीएम मोदींना मागे टाकल्यानंतर आता ती लवकरच प्रियांका चोप्राला मागे टाकू शकते. 'एक्स'वर पंतप्रधान मोदी यांना 101.2 मिलियन चाहते फॉलो करतात, ही सध्या खूप मोठी आहे. तसेच प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स कोणाचे आहेत?

प्रियांका चोप्रा 91.8 मिलियन

श्रद्धा कपूर- 91.4 मिलियन

नरेंद्र मोदी- 91.3 मिलियन

आलिया भट्ट- 85.1 मिलियन

कतरिना कैफ- 80.4 मिलियन

दीपिका पदुकोण- 79.8 मिलियन

स्टार क्रिकेटर विराट कोहली 271 मिलियन (भारतातील सर्वाधिक)

स्टार फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो 636 मिलियन (जगातील सर्वाधिक)

'स्त्री 2' चित्रपटाचं कलेक्शन : हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2'च्या 6 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 300 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. तसेच जॉन अब्राहम स्टारर 'वेदा' आणि अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'खेल खेल में' 15 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2'बरोबर प्रदर्शित झाले होते. 'वेदा' आणि 'खेल खेल में' हे दोन्ही चित्रपट 'स्त्री 2'मुळे विशेष बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकलेले नाही. आता सध्या बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2' चित्रपट राज्य करत आहे.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2'नं रोवले यशाचे झेंडे, पाहा कमाईचा आकडा - STREE 2 movie
  2. 'स्त्री 2'च्या सक्सेस पार्टीला श्रद्धा कपूर, राजकुमार रावसह इतर सेलिब्रिटींनी लावली हजेरी - STREE 2
  3. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा केला पार - Stree 2 Box Office Collection Day 2

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.