मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चनच्या आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. सरदार उद्यम सिंग, पिकू, विकी डोनर, पिंक, यासारखे चित्रपट बनवणाऱ्या शूजित सरकार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. प्रत्येकजण शूजित यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक करतात आणि त्यांच्याबरोबर अनेक बॉलिवूड कलाकारांना काम करण्याची इच्छा असते. यावेळी अभिषेक आणि शूजित काहीतरी नवीन आणि वेगळे घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहून स्पष्ट होतं आहे की, अभिषेक जीवनाचे तत्त्वज्ञान सांगेल. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरसह प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.
'आय वॉन्ट टू टॉक'चा टीझरमध्ये काय आहे? : अभिषेकनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक त्याचा पुतळा आहे, जो कारमध्ये बसवला आहे. या पार्श्वभूमीवर अभिषेक म्हणतो, "मला बोलायला आवडते, मी बोलण्यासाठी जगतो. मला जिवंत आणि मेलेल्या माणसांमध्ये एवढाच फरक दिसतो की, जिवंत लोक बोलू शकतात आणि मेलेले लोक बोलू शकत नाहीत." या चित्रपटाचा टीझर शेअर करताना अभिषेकनं लिहिलं, 'आपल्या सर्वांना माहित आहे की, एक व्यक्ती ज्याला बोलायला आवडते आणि जी नेहमी आयुष्याची चांगली बाजू पाहतो, त्याला कितीही जीवनात आव्हाने आली तरीही. टॅग करा ज्याला बोलायला आवडते.'
चित्रपट कधी होणार प्रदर्शित : अभिषेक बच्चन अभिनीत 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर शेअर होताच बी-टाउन सेलिब्रिटींनी याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपनं या पोस्टवर लिहिलं, 'काय टीझर आहे.' सोनू सूदनं यावर लिहिलं, 'लूकिंग अमेझिंग ब्रदर.' याशिवाय करण जोहरनं लिहिलं, 'माझा आवडता चित्रपट निर्माता,आवडता अभिनेता, काहीतरी जादुई घडणार आहे.' दरम्यान अभिषेक बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रेमो डिसूझाच्या 'बी हॅप्पी'मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर रिलीज होईल. याशिवाय तो सुजॉय घोष दिग्दर्शित शाहरुख खानच्या 'किंग'मध्येही असणार आहे.
हेही वाचा :