ETV Bharat / entertainment

शहजादा धामी बिग बॉस 18 मधून बेघर, दिग्विजय सिंहची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री - BIGG BOSS 18 EVICTION THIS WEEK

Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' च्या स्पर्धकांना दिवाळीत कोणीही घराबाहेर जाणार नाही, असं वाटत असताना एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळं इतरांना धक्का बसला.

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (Bigg Boss 18 team)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 1, 2024, 12:23 PM IST

मुंबई - 'बिग बॉस 18' मध्येही दिवाळी सेलेब्रिशनचं वातावरण आहे. मात्र या घरात किरकोळ कुरबुरीचे फुलबाजे आणि जोराचा धमाके करणारे आयटम बॉम्ब फुटत आहेत. प्रत्येत स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करुन सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ज्यावेळी नॉमिनेशनचा विषय येतो तेव्हा ते एकमेकांचं नाव घेताना दिसतात. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बेघर होण्यासाठी सात लोकांची नावं पुढं आली आहेत. यामध्ये आरफीन खान, श्रुतिका अर्जुन, ईशा सिंह, एलिस कौशिक, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोड़कर आणि शहजादा धामी यांची नावं आहेत. आता दिवाळी सुरू असल्यामुळं कोणी बेघर होणार नाही असाच विश्वास प्रत्येकाला वाटत होता. मात्र त्यांचा हा विश्वास बिग बॉसनं फोल ठरवला आहे.

शहजादा धामी बिग बॉसमधून बेघर - या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बेघर होणारा स्पर्धक असेल शहजादा धामी. ऐन दिवाळीत त्याला बिग बॉसमधून बाहेर पडावं लागणार आहे. अलीकडच्या काळात त्याच्यावर बिग बॉसच्या घरातील स्पर्धक तर नाराज होतेच परंतु प्रेक्षकही त्याच्यावर सोशल मीडियातून टीका करताना दिसत होते.

'बिग बॉस 18' च्या अलीकडच्या भागात विव्हियन डिसेना आणि शहजादा धामी यांच्यात घरातील कामावरुन कडाक्याचं भांडण झालं होतं. घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे शहजादा नाराज झाला होता. त्यावर वाढत गेलेलं हे भांडण त्याला महागात पडलेलं दिसतंय. ही बातमी शहजादाच्या चाहत्यांना मात्र धक्का देणारी ठरत आहे.

अ‍ॅलीस कौशिकला रडू अनावर - दरम्यान 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक अ‍ॅलीस कैशिक हिचाही क्लास घेताना सलमान खान दिसणार आहे. अलीकडेच अ‍ॅलीसनं करणवीरला आपल्या खासगी गोष्टी सांगितल्या होत्या. तिनं आपल्या प्रियकराचा उल्लेख करत त्यानं आपल्याला प्रपोज केल्याचंही सांगितलं होतं. अ‍ॅलीस ही अभिनेता कंवर ढिल्लन याच्याशी काही काळापासून डेट करत आहे. त्यानं मात्र तिच्या या दाव्याला खोडून काढलंय ही गोष्ट सलमाननं अ‍ॅलीसला सांगताच तिला विश्वासच बसला नाही. त्यानंतर बिग बॉसच्या घरात ती रडताना दिसते.

बिग बॉसच्या घरात दिग्विजय सिंहची वाईल्ड कार्ड एन्ट्री - 'बिग बॉस 18' मध्ये पहिलीच वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. या स्पर्धकाचं नाव आहे दिग्विजय सिंह राठी. तो एमटीव्ही रोडीज 19 चा एक भाग होता. त्यानंतर तो एमटीव्ही स्प्लिट्सविलामध्येही सहभागी झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.