मुंबई - Shahid Kapoor Deva : अभिनेता शाहिद कपूरला चित्रपटातील यशासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या यशामध्ये सातत्य दिसत नाही. 'कबीर सिंग'ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चा अपवाद वगळता त्याच्या नावावर 'एकही मोठा हिट चित्रपट नाही. आता तो नवीन अवतारासह त्याच्या चाहत्यांसाठी अॅक्शन थ्रिलर 'देवा' हा चित्रपट घेऊन सज्ज झालाय.
शाहिदने इंस्टाग्रामवर नवीन रिलीज तारखेच्या घोषणेसह स्वतःचं एक मनोरंजक नवीन पोस्टर चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहिद फुल अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. टी-शर्ट आणि जीन्सवर बुलेट प्रूफ जॅकेट परिधान करुन हातात बंदूक घेऊन लढाईसाठी सज्ज झाला आहे. पोस्टरसह त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "हिंसक व्हॅलेंटाईन डेसाठी सज्ज व्हा. देवा 14 फेब्रुवारी 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे!"
ही बातमी त्यानं शेअर करताच त्याचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा कमेंट सेक्शन भरुन टाकला आहे. त्याचा भाऊ ईशान खट्टरने फायर इमोजी टाकला आहे. तर एका युजरनं म्हटलंय, "प्रतीक्षा करू शकत नाही." "शाहीद कपूरला लढाऊ पोलीस म्हणून मोठ्या पडद्यावर पाहणं खूप आनंददायक असेल," असं दुसऱ्या एका युजरनं कमेंटमध्ये म्हटलंय.
एका हाय-प्रोफाइल केसमध्ये अडकलेल्या एका बंडखोर पोलिसाची व्यक्तिरेखा शाहिद कपूर या चित्रपटात साकारत आहे. तपासात जसजसा तो खोलवर जातो तसतसे तो फसवणूक आणि विश्वासघाताचा एक गुंतागुंतीचा जाळं उलगडतो आणि तपासाच्या एका धोकादायक प्रवासात अडकतो. या चित्रपटात पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत आघाडीची नायिका म्हणून काम करत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शाहिदनं या चित्रपटाची पहिली झलक शेअर केली होती.
यापूर्वी 'देवा' हा चित्रपट दसरा 11 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणार होता. परंतु या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकलण्यात आलंय आणि हा चित्रपट आता पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होणार आहे.
प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माते रोशन अँड्र्यूज द्वारे दिग्दर्शित, आणि सिद्धार्थ रॉय कपूर निर्मित 'देवा' चित्रपट एक अॅक्शन-पॅक्ड रोलर-कोस्टर राइड थ्रिल आणि ड्रामाने भरलेले आहे. 'सॅल्यूट' आणि 'कायमकुलम कोचुन्नी' सारख्या मल्याळम चित्रपटांसाठी रोशन एंड्र्यूज यांना ओळखलं जातं. आता 'देवा' हा चित्रपट पाहण्यासाठी 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा -