ETV Bharat / entertainment

शाहिद कपूर स्टारर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दमदार अ‍ॅक्शन पाहून चाहते झाले थक्क... - DEVA TRAILER OUT

शाहिद कपूर अभिनीत 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज झाला आहे. आता शाहिदची दमदार अ‍ॅक्शन चाहत्यांना खूप पसंत पडली आहे.

shahid kapoor
शाहिद कपूर (शाहिद कपूर 'देवा' (Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 17, 2025, 4:34 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'देवा' पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आज 17 जानेवारी रोजी या चित्रपटाचा एक धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच शाहिदच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 'देवा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद हा दमदार अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटातील शाहिदचं पात्र हे कबीर सिंगची आठवण करून देत आहे. 'देवा'मध्ये शाहिदचे पात्र रागीट असल्याचं दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप धमाकेदार आहे.

'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज : झी स्टुडिओजनं प्रदर्शित केलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात मुंबई शहरापासून होते. ट्रेलरमध्ये शाहिद म्हणतो की, "ते आमच्या फंक्शनमध्ये घुसले आणि माझ्या भावाला गोळ्या घालून ठार मारले. आता माझी वेळ आहे, आता आपण प्रवेश करू." यानंतर, शाहिद कपूरची एन्ट्री होते. ट्रेलरच्या बहुतेक भागात शाहिद कपूर हातात बंदूक घेऊन दाखवला गेला आहे. ट्रेलरमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे, की शहरामधून गुंडगिरी संपविण्यासाठी देवा (शाहिद कपूर) हा प्रयत्न करत आहे. याशिवाय तो आपल्या भावाचा बदला देखील या माध्यामातून घेत आहे. या चित्रपटामधील 'भसड मचा' गाणं देखील रिलीज झालं आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त हिट झालं आहे.

शाहिदची अ‍ॅक्शन पाहून चाहते थक्क : 'देवा' चित्रपटामध्ये शाहिद हा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान ट्रेलरच्या पार्श्वभूमीत 'आला रे आला, देवा आला हे' गाणं देखील ऐकायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना शाहिदची दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर पाहून चाहते आपल्या आता प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'मला कबीर सिंग आठवला.' दुसऱ्या एकानं लिहिलं 'मला आशा आहे की, हा चित्रपटही कबीर सिंग सारखा हिट होईल.' आणखी एकानं या पोस्टवर लिहिलं ' शाहिद कपूरला या सायको कॅरेक्टरमध्ये पाहून मी थक्क झालो.' याशिवाय शाहिदचे काही चाहते त्याच्या या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर 'देवा'चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
  2. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर ॲक्शन थ्रिलर 'देवा'ची रिलीज डेट नवीन पोस्टरसह आली समोर
  3. शाहिद कपूर आणि करीना कपूर दिसले एकत्र, युजर्सनं दिल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.