मुंबई - Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर सध्या बॉक्स ऑफिसवर त्याच्या लव्ह-रोमँटिक रोबोटिक ड्रामा चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'मुळे चर्चेत आहे. 9 फेब्रुवारीला चॉकलेट डेच्या दिवशी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. दरम्यान, शाहिद कपूरनं बॉलिवूड कॅम्पवर आपला संताप व्यक्त केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आउटसाइडर लोकांना कशी वागणूक दिली जाते याबद्दल खुद्द शाहिदनं खुलासा केला आहे. शाहिद अलीकडेच अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' शोमध्ये दिसला होता. शाहिद कपूर आणि नेहा कॉमेडी ड्रामा फिल्म 'चुप चुपके' मध्ये एकत्र दिसले आहेत. नेहाच्या शोमध्ये शाहिदनं हिंदी चित्रपटसृष्टीमधील संपूर्ण सत्य समोर आणलं आहे.
आउटसाइडरला बॉलिवूडमध्ये दिली जाणारी वागणूक : या शोदरम्यान शाहिदनं , हिंदी चित्रपटसृष्टीत आजपर्यंत त्याचा छळ होत असल्याचं म्हटलं आहे. त्यानं पुढं सांगितलं की, 'कदाचित माझ्यामध्ये त्यांच्या कॅम्पचा भाग होण्याची गुणवत्ता नसेल, मी दिल्लीहून मुंबईमध्ये आलो होतो. मुंबईत आल्यानंतर माझ्या क्लासमध्ये माझ्याशी कोणी नीट बोलत नव्हतं. मला त्यावेळी खूप त्रास झाला. मला खूप दिवस वाईट वागणूक दिली गेली. मी भाड्याच्या घरात राहिलो, म्हणून दर 11 महिन्यांनी मला शिफ्ट करावं लागत होतं. नवीन इमारतीत राहिलो आणि नवीन मित्र बनवले, नंतर मी कोरिओग्राफर श्यामक दावरचा ग्रृप जॉईन केला. याशिवाय मी कॉलेजमध्ये गेलो. माझा स्वतःचा एक ग्रृप तयार झाला आणि काही वर्षानंतर मी अभिनेता झालो.''
शाहिद कपूरनं केला खुलासा : शाहिदनं पुढं म्हटलं, ''जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो, तेव्हा मला कळले की हे शाळेसारखे आहे, आता या गोष्टीमध्ये अनेक वर्षे राहवं लागेल, बॉलिवूडमध्ये आउटसाइडर लोकांना सहज स्वीकारलं जात नाही, त्यांच्या मोठ्या समस्या आहेत. अनेकजण म्हणतात की तू कसा काय हिंदी चित्रपटसृष्टीत आलास.' मला कॅम्प कल्चर अजिबात आवडत नाही, मला बुली करणारे लोक आवडत नाही. आता जर कोणी मला बुली केली तर मी त्यांना सोडणार नाही.'' दरम्यान शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो, 'देवा' आणि 'बुल' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :