ETV Bharat / entertainment

शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी स्टारर आगामी चित्रपटाची घोषणा, लवकरच होणार चित्रीकरण सुरू - shahid triptii starrer Movie - SHAHID TRIPTII STARRER MOVIE

Shahid Kapoor and Triptii Dimri : शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी या फ्रेश जोडीच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट बनवणार आहेत.

Shahid Kapoor and Triptii Dimri
शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी (शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 13, 2024, 5:27 PM IST

मुंबई - Shahid Kapoor and Triptii Dimri : अभिनेता सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'चे निर्माते नाडियादवाला यांनी आपला चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. नाडियादवाला हे शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी या नव्या जोडीबरोबर एक चित्रपट घेऊन येत आहेत. शाहिद आणि तृप्ती अभिनीत हा चित्रपट ॲक्शन एंटरटेनर असणार आहे. या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज करणार आहेत. विशाल आणि शाहिदनं याआधी 'कमिने' (2009) या चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. 'कमिने' चित्रपटामध्ये शाहिदबरोबर प्रियांका चोप्रा दिसली होती.

चित्रपटाची लवकरच शूटिंग सुरू होईल : याशिवाय विशाल भारद्वाजनं शाहिद कपूरबरोबर 'रंगून' (2017) चित्रपटही केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला होता. आता सात वर्षांनी विशाल आणि शाहिद कपूर एका चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. विशाल आणि शाहिद या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. नाडियादवालाच्या या ॲक्शन एंटरटेनर चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप जाहीर करण्यात करण्यात आलेलं नाही. मात्र विशाच्या चित्रपटामध्ये शाहिद आणि तृप्ती यांची फ्रेश जोडी बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटापासून तृप्तीला अनेक चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत.

शाहिद आणि तृप्तीचं वर्कफ्रंट : दरम्यान तृप्तीला 'अ‍ॅनिमल'मधून मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये तिनं 'झोया'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून तिला 'भाभी 2' या नावानेही प्रसिद्ध मिळाली. दरम्यान तृप्ती डिमरी अलीकडेच विकी कौशल आणि एमी विर्क स्टारर रोमँटिक कॉमेडी ड्रामा 'बॅड न्यूज'मध्ये दिसली होती. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता तिचा राजकुमार रावबरोबरचा आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूप मजेशीर आहे. 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपट 11 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे शाहिद कपूर सध्या त्याचा ॲक्शन चित्रपट 'देवा'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याआधी, शाहिद कपूर हा क्रिती सेनॉनबरोबर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा :

  1. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ'चं ट्रेलर रिलीज, हसा खळखळून - VVKWV trailer out
  2. हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी तृप्ती दिमरी आतुर, 'चंचूप्रवेशा'साठी शोधतेय मदतीचा हात - TRIPTII DIMRI HOLLYWOOD DREAMS
  3. शाहिद कपूरच्या 'देवा'ला नवीन रिलीज तारीख मिळाली, दमदार पोस्टरसह जाहीर केली तारीख - Shahid Kapoor Deva

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.