ETV Bharat / entertainment

रजनीकांतच्या 'थलैयवा 171' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री? बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो भुकंप - Thalaiyava 171 - THALAIYAVA 171

Thalaiyava 171 : शाहरुख खान, माइक मोहन आणि विजय सेतुपती यांची नावं रजनीकांतच्या आगामी 'थलैयवा 171' या अ‍ॅक्शन चित्रपटाशी जोडली जात आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराज करत आहेत. शाहरुख, रजनीकांत आणि लोकेश हे त्रिकुट एकत्र आलं तर बॉक्स ऑफिसवर धमाका होऊ शकतो.

Thalaiyava 171
रजनीकांत आणि शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 5:33 PM IST

मुंबई - Thalaiyava 171 : साऊथचा सुपरस्टार रजनीकांत सध्या त्याच्या आगामी 'थलैयवा 171' आणि 'वेट्टीयान' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आता रजनीकांतच्या 'थलैयवा 171' आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार शाहरुख खान रजनीकांतच्या चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि रजनीकांत रा-वन चित्रपटात एकत्र दिसले होते. रा-वनमध्ये रजनीकांतचा कॅमिओ होता आणि आता शाहरुख खान 'थलैयवा 171' मध्ये कॅमिओ करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विक्रम आणि लिओ चित्रपटातून धमाका केल्यानंतर लोकेश कनागराज आता रजनीकांत बरोबर पहिल्यांदाच चित्रपट बनवणार आहे. आता या चित्रपटात शाहरुख खान कॅमिओ करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाले तर रजनीकांत, शाहरुख खान आणि लोकेश कनगराज हे त्रिकूट बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवू शकते. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

'थलैयवा 171' खलनायक कोण?

दुसरीकडे, रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी चांगल्या खलनायकाचा शोध सुरू आहे. या चित्रपटासाठी अभिनेता माईक मोहनचे नाव पुढे येत आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप त्याचंही नावे जाहीर केलेलं नाही. या चित्रपटात रणवीर सिंग आणि साऊथचा डॅशिंग खलनायक विजय सेतुपती यांचीही नावे समोर आली आहेत. 22 एप्रिल रोजी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा होणार आहे. चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रजनीकांतचा अलिकडेच लाल सलाम हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतनं बनवला होता. यामध्ये 'थलैयवा' रजनीने कॅमिओ भूमिका केलेली असली तरी यातील रजनीकांतच्या भूमिकेचें खूप कौतुक झालं होतं. त्या अगोदर रजनीकांतची मुख्य भूमिका असलेला जेलर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करुन मोठं यश मिळवलं होतं. आता त्याच्या आगामी 'थलैयवा 171' आणि 'वेट्टीयान' या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा -

नॅशनल सिबलिंग डेच्या प्रसंगी जाणून घ्या बॉलिवूडमधील काही सुंदर भावंडाच्या जोडीबद्दल - Siblings Day 2024

वरुण धवन आणि तापसी पन्नू यांनी सांगितलं त्याच्या आयुष्यातील भावंडाचं महत्त्व - National Siblings Day

बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएबरोबरच्या खासगी लग्नाबद्दल तापसी पन्नूनं केला खुलासा - taapsee pannu and wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.