ETV Bharat / entertainment

शाहरुख खाननं विमानतळावर साजरा केला 'फॅन'चा वाढदिवस, पापाराझींचे केले कौतुक - वाढदिवसाच्या शुभेच्छा

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खानचा विमानतळावरील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पापाराझी फोटोग्राफरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

Shah Rukh Khan
शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 3:00 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. 'किंग खान' आपल्या चाहत्यांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कधीच मागेपुढे पाहत नाही. काल रात्री मुंबई विमानतळावर शाहरुख खान दिसला. यावेळी त्याला पापाराझीनं घेरल होतं. तेव्हा किंग खाननं एका चाहत्याचे मन जिंकले. विमानतळावर शाहरुखनं चक्क त्याच्या चाहत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. शाहरुख खान त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या निमित्तानं मुंबईबाहेर गेला आहे. आता चाहत्याला आशीर्वाद देतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 'किंग खान'चे चाहतेही या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

शाहरुख खानचा विमातळावरील व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओत तुम्ही बघू शकता की शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानीबरोबर विमानतळावर ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. काळ्या कार्गो पँट, टी-शर्ट आणि काळ्या जॅकेटमध्ये शाहरुख सुंदर दिसत आहे. यावर त्यानं हेयरबँडनं आपली केस मागे बांधले आहेत. शाहरुख खान कारमधून खाली उतरला, तेव्हा त्याला सांगितले की आज पापाराझी फोटोग्राफरचा वाढदिवस आहे. त्यावेळी फोटोग्राफर शाहरुखचा फोटो काढत होता. यानंतर शाहरुख खाननं या फोटोग्राफरचा हात धरून त्याला आशीर्वाद दिला. फोटोग्राफरनं शाहरुख खानच्या हाताचं चुंबन घेतलं आणि त्याचा हात आपल्या कपाळावर लावला. व्हायरल झालेला हा व्हिडिओ शाहरुख खानच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. अनेकजण 'किंग खान'च्या स्वभावाचे कौतुक करत आहेत.

शाहरुख खान वर्कफ्रंट : 'किंग खान'च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी तो राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर तापसी पन्नू, विक्की कौशल, अनिल ग्रोव्हर, बोमन इराणी,विक्रम कोचर, सतीश शाह, देवेन भोजानी हे कलाकार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिस हिट ठरला होता. आता पुढं किंग खान 'टायगर वर्सेस पठान'मध्ये सलमान खानबरोबर दिसणार आहे. 'टायगर वर्सेस पठान' चित्रपट 2025 मध्ये फ्लोअरवर जाईल आणि 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक पाहून युजर्सना झाली 'पुष्पा'ची आठवण
  2. 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त पाहा काही विशेष रोमँटिक चित्रपट
  3. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूने दिल्या त्यांच्या 'व्हॅलेंटाईन फॉरएव्हर'ला शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.