मुंबई - Shah Rukh Khan Phalke Awards 2024 : अभिनेता शाहरुख खानसाठी मंगळवारची रात्र खूप विशेष होती. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स (DPIFF) 2024 मध्ये त्याने 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकला आहे. ॲटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटातील अभिनयासाठी शाहरुखला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर किंग खानने मंचावरून भाषण देत खिल्ली उडवली. त्याने त्याच्या भाषणात म्हटलं, ''ज्यूरी सदस्यांनी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी पात्र मानले आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद. मला खूप वर्षेंपासून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नाही. आता मला वाटत होते की, मला कधीच अवार्ड मिळणार नाही, मी खूप आनंदी आहे. मला पुरस्कार खूप आवडतात, मी थोडा लोभी आहे.'' यानंतर 'किंग खान'ने 'जवान' टीमचे आभार मानले.
शाहरुख खान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला : किंग खानने पुढे म्हटले, ''लोकांनी माझ्या कामाला लेखलं मला याचा आनंद झाला आहे, मी वचन देतो की मी कठोर परिश्रम करत राहीन आणि भारत आणि परदेशातील लोकांचे मनोरंजन करत राहीन.'' शाहरुखने जानेवारी 2023 मध्ये सिद्धार्थ आनंदच्या 'पठाण' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होते. या चित्रपटात शाहरुख ॲक्शन अवतारात दिसला होता. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपले नाव नोंदवले. 'झिरो' आणि 'जब हॅरी मेट सेजल' सारख्या अनेक फ्लॉप चित्रपटांनंतर आणि चार वर्षांच्या विश्रांतीनंतर शाहरुखचा हा चित्रपट पहिला हिट ठरला होता.
2023 वर्ष शाहरुखसाठी लकी : 'पठाण'नंतर शाहरुख सप्टेंबरमध्ये 'जवान'मधून रुपेरी पडद्यावर परतला. या चित्रपटात तो पुन्हा एकदा ॲक्शन अवतारात दिसला. 'जवान'ने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिक कमाई केली. 2023 वर्ष शाहरुखसाठी खूप छान होते. शाहरुख इथेच थांबला नाही, त्याचा 'डंकी' चित्रपट डिसेंबरमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला.
हेही वाचा :