ETV Bharat / entertainment

शाहरुख खाननं नेटफ्लिक्सवर व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त दिलं चाहत्यांना सरप्राईज - Shah rukh khan

Shah Rukh khan : शाहरुख खाननं नेटफ्लिक्सवर 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त एक सरप्राईज व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये तो काहीतरी मोठं घडणार असल्याचं सांगत आहे.

Shah Rukh khan
शाहरुख खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 5:27 PM IST

मुंबई - Shah Rukh khan : अभिनेता शाहरुख खाननं 2023 मध्ये एक नव्हे तर तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिलं आहेत. यामध्ये 'पठाण' आणि 'जवान' या दोन ॲक्शन चित्रपटांचा समावेश आहे, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रत्येकी 1000 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. याशिवाय 'किंग खान'च्या 'डंकी' चित्रपटानं 400 कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला. दरम्यान 'पठाण' आणि 'जवान' ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. आता किंग खानचा 'डंकी' चित्रपट ओटीटीवर लवकरच रिलीज होणार आहे. आज 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त शाहरुख खान नेटफ्लिक्सवर सरप्राईज व्हिडिओ जारी केला आहे.

नेटफ्लिक्सवर व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त काहीतरी खास होणार : शाहरुखनं 14 फेब्रुवारी रोजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काहीतरी विशेष घडणार असल्याचं संकेत दिले आहेत. व्हिडिओमध्ये त्यानं म्हटलं, ''आज 14 फेब्रुवारीला, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की नेटफ्लिक्सवर काहीतरी खास घडणार आहे, तर लवकरच भेटूया.'' किंग खानचा हा व्हिडिओ शेअर करण्याबरोबरच, नेटफ्लिक्सनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "वर्षातील सर्वात रोमँटिक दिवशी किंग ऑफ रोमान्स एक सरप्राईज घेऊन येत आहे." शाहरुख खानचे चाहते असा अंदाज लावत आहेत की त्याचा नुकताच रिलीज झालेला 'डंकी' हा ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहे. आता या व्हिडिओवर 'किंग खान'चे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

' डंकी' चित्रपटाबद्दल : 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '3 इडियट्स' दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी बनवला आहे. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. 'डंकी'नंतर शाहरुखनं अद्याप त्याच्या कोणत्याही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. सुजॉय घोषची निर्मिती असलेल्या चित्रपटात शाहरुख खान मुलगी सुहाना खानबरोबर दिसणार असल्याचं बोललं जात आहे. शाहरुख खान दुबईत वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये आहे, जिथे त्यानं त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही चर्चा केली आहे.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024च्या परिषदेत झाला सहभागी
  2. अक्षय कुमार-टायगरचा 'व्हॅलेंटाईन्स डे'ला 'रोमान्स नव्हे ब्रोमान्स', 'बडे मियाँ'च्या हातावर 'छोटे मियाँ'ची कसरत
  3. आमिर खानने सांगितली 'सितारे जमीन पर'च्या रिलीजची तारीख, स्क्रिप्टचे अपडेट केले शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.