ETV Bharat / entertainment

शाहरुख खान स्टारर 'बाजीगर'च्या सीक्वेलबद्दल निर्मात्यांनी केला खुलासा, वाचा सविस्तर - SHAH RUKH KHAN

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाजीगर'चा सीक्वेलबद्दल एक माहिती समोर आली आहे. नुकतेच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वेलबाबत मौन सोडले आहे.

shah rukh khan
शाहरुख खान (बाजीगर 2 (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 13, 2024, 5:21 PM IST

मुंबई : चित्रपट निर्माते रतन जैन यांनी अलीकडेच 1993च्या ब्लॉकबस्टर बॉलिवूड थ्रिलर, 'बाजीगर'च्या बहुप्रतीक्षित सीक्वलबद्दलची माहिती शेअर केली आहे. शाहरुख खान स्टारर 'बाजीगर' हा बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यात शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल, जॉनी लिव्हर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.'बाजीगर' 1993 मध्ये रिलीज झाला होता. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वेलची मागणी करत आहेत. नुकतेच, निर्मात्यांनी यावर मौन सोडले आहे. एका मुलाखतीत, रतन जैन यांनी पुष्टी केली की, "बाजीगर 2 बद्दल चर्चा सध्या सुरू आहे.' विशेषत: या चित्रपटात शाहरुख खानच्या उपस्थितीबद्दल त्यांनी म्हटलं, 'बाजीगर 2 बद्दल आम्ही शाहरुखशी बोललो आहोत, आतापर्यंत या चित्रपटाबाबत काहीही झालेलं नाही."

'बाजीगर 2'ची झाली पुष्टी : आता 'बाजीगर 2'च्या पुष्टीमुळे शाहरुखचे चाहते खूप आनंदी आणि उत्साहित झाले आहेत. याशिवाय सीक्वलबद्दल बोलताना जैन यांनी पुढं सांगितलं, "शाहरुख खान पुन्हा त्याची भूमिका साकारण्यास राजी होईल, तेव्हाच हा सीक्वेल बनवला जाईल, कारण लोकांना हे पात्र खूप आवडले आहे आणि शाहरुखला या भूमिकेत पाहण्याची इच्छा सर्वांची आहे. जैन यांना शाहरुखला या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेसाठी कास्ट करायचे आहे. बाजीगरचे संवाद आजही लोकांच्या ओठावर आहेत. याशिवाय या चित्रपटामधील गाणी आजही आयकॉनिक आहेत.

स्क्रिप्टवर काम चालू आहे : या मुलाखतीत निर्मात्यांनी सांगितलं की, ते या चित्रपटासाठी चांगली स्क्रिप्ट घेऊन येणार आहेत. कारण 'बाजीगर' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे आणि चाहत्यांना त्याच्या सीक्वलकडून खूप जास्त अपेक्षा असतील. याशिवाय, सीक्वेलसाठी एक उत्तम दिग्दर्शक आणि क्रू देखील लागेल, याबद्दल त्यांनी म्हटलं. याशिवाय त्यांनी पुढं सांगितलं, "आम्ही सीक्वलबद्दल शाहरुखशी बोललो आहोत, मात्र आतापर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. निर्मात्याचे हे वक्तव्य ऐकून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. दरम्यान 'बाजीगर' अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात शाहरुख खाननं खलनायकाची भूमिका साकारली होती.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान स्टारर रोमँटिक लव्हस्टोरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर रि- रिलीज 'या' तारखेला होईल...
  2. शाहरुख सलमान स्टारर 'करण अर्जुन'च्या ट्रेलरसाठी हृतिक रोशननं दिला आवाज, व्हिडिओ झाला व्हायरल
  3. शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट; कथित आरोपी म्हणतो, माझा फोन चोरीला गेला होता...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.