मुंबई : शाहरुख खान त्याच्या बहुप्रतीक्षित 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यानं आयफा अवॉर्ड्स 2024 दरम्यान 'किंग' चित्रपटाची पुष्टी केली. 'किंग' या चित्रपटासाठी त्यानं केस कापले आहेत. शाहरुख खान आयफाच्या स्टेजवर त्याच्या नवीन हेअरकटमध्ये दिसला होता. शाहरुखच्या 59व्या वाढदिवशी त्यानं आपले केस लहान केले आहेत. आता सोशल मीडियावर शाहरुख खानच्या नवीन हेअरस्टाईलमधील फोटो व्हायरल होत आहेत. शाहरुख खान 'किंग'मध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसणार आहे. जवानचे दिग्दर्शक अॅटली यांनी शाहरुख खानला हा नवीन लूक दिला असल्याचं समजत आहे.
शाहरुख खानचं स्टाईलिश लूक व्हायरल : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले शाहरुख खानचे हे फोटो त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. शाहरुखच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर यात त्यानं चष्मा घातला असून राखाडी केसांसह तो खूपच स्टायलिश दिसत आहे. याशिवाय आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये शाहरुख खान मुलगी सुहाना खानबरोबर विमानतळावर दिसत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शाहरुख खान ऑल ब्लॅक लूकमध्ये खूप स्टाईलिश दिसत आहे. याशिवाय फोटोत शाहरुखनं सुहाना खानचा हात पकडला आहे. यावेळी सुहाना चेक शर्ट, काळी पँट आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये खूप देखणी दिसत आहे.
शाहरुख खानवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव : या फोटोच्या कमेंट विभागात एका चाहत्यानं लिहिलं आहे, 'आता बॉक्स ऑफिसवर भूकंप येईल.' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं की,'ॲटली सरांनी हा लूक नक्कीच दिला असेल.' आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'शाहरुख हा लूक जोरदार आहे.' आता शाहरुखचे चाहते त्याच्या या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय आता अनेक चाहते ॲटलीच्या सल्ल्यानुसार शाहरुख खाननं लहान केस केले असल्याचं म्हणत आहे. 'जवान' या चित्रपटात शाहरुख खान लहान केसांपासून ते टक्कलपर्यंतच्या भूमिकांमध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
हेही वाचा :