ETV Bharat / entertainment

अबराम आणि गौरीबरोबर लंडनहून परतताच विमाीनतळावर दिसला शाहरुख खानचा रुबाब - Shah Rukh Khan news - SHAH RUKH KHAN NEWS

Shah Rukh Khan news : यूकेमध्ये सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख मुंबईत परतला आहे. मुंबई विमानतळावर त्यानं आपल्या नेहमीच्या स्टाईलनं एन्ट्री केली आणि उपस्थित पापाराझींनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड केली. खान कुटुंबीयांचा हा विमानतळावरील स्टायलिश व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे बातमी वाचा.

Shah Rukh Khan
अबराम आणि गौरीबरोबर शाहरुख खान ((Video screen grab))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 1:08 PM IST

मुंबई - Shah Rukh Khan news : 14 जुलै रोजी मुंबईतील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य विवाह सोहळ्याला उपस्थिती राहिल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खान तातडीनं यूकेला रवाना झाला होता. जवळपास एक आठवडा नियोजित सहल पूर्ण केल्यानंतर तो मुंबई विमानतळावर परतताना दिसला.

शाहरुखच्या बरोबर यावेळी त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा अबरामदेखील होता. विमानतळातून बाहेर पडताना शाहरुखनं अबरामचा हात पकडला होता तर गौरी त्याच्या पाठोपाठ चालताना दिसली. खान कुटुंबीयांनी थेट आपल्या कारच्या दिशेनं जाणं पसंत केलं, त्यावेळी शाहरुखनं गौरी आणि अबराम आपल्याबरोबरच राहतील याची विशेष काळजी घेतली. त्यांच्या या ताफ्यामध्ये शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी आणि त्याचा निष्ठावान अंगरक्षक रवी सिंग यांचाही समावेश होता.

अबराम आणि गौरीबरोबर शाहरुख खान (SRK returns from London with Gauri Khan and son AbRam (ANI))

यावेळी शाहरुख काळ्या रंगाच्या टी शर्ट, जीन्स आणि शूज अशा कॅज्युअल लूकमध्ये होता. त्यानं यावेळी सनग्लासेस परिधान केलं होतं आणि त्याच्या बरोबर ऑरेंज रंगाची बॅग होती. यावेळी गौरी पांढऱ्या कपड्यांमध्ये बॅगी जॅकेट, शूज कॅप आणि डार्क सनग्लासेसह दिसली. अबरामनं निळ्या रंगाच्या टी शर्ट, शॉर्ट आणि स्निकर्ससह दिसत होता.

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या विवाह समारंभाला हजर राहिल्यानंतर लग्नाच्या 'मंगल उत्सवात' सहभागी न होता शाहरुख कुटुंबासह लंडनकडे रवाना झाला होता. असं असलं, तरी अंबानी विवाहसोहळ्यात खान फॅमिली अतिशय आनंदात सामील झाली होती.

या विवाह सोहळ्यात शाहरुख खान नीता अंबानींबरोबर 'छंय्या छंय्या' डान्स करताना दिसला, यावेळी या नृत्यात रणबीर कपूर आणि विकी कौशलही सामील झाले होते. त्यानं हात जोडून रजनीकांत यांना अभिवादन केलं होतं, तर सचिन तेंडूलकरबरोबर संवाद साधला आणि अमिताभ बच्चन, जया बच्चन यांचा आशीर्वाद घेतला होता.

कामाच्या आघाडीवर शाहरुख खान आगामी चित्रपटात लेक सुहाना खानबरोबर काम करणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक 'किंग' असल्याचं सांगितलं जातंय. सुजय घोष दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. याशिवाय शाहरुख खान 'टायगर व्हर्सेस पठाण' या चित्रपटात सलमान खान याच्या बरोबर 'पठाण'च्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ आणि जया बच्चनच्या पाया पडला शाहरुख खान - Anant Radhika Wedding
  2. सलमान खान आणि शाहरुख खान यांनी अनंत - राधिकाच्या लग्नात नीता अंबानीबरोबर केला डान्स - Salman Khan and Shah Rukh Khan
  3. शाहरुख खानची बॉलिवूडमध्ये 32 वर्षे, जाणून घ्या त्याच्या हिट चित्रपटांबद्दल - SHAH RUKH KHAN

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.