ETV Bharat / entertainment

शाहरुख खान स्टारर 'पठाण 2'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार साऊथ स्टार - Pathaan 2 - PATHAAN 2

Pathaan 2: शाहरुख खानचे त्याच्या मोस्ट अवेटेड 'पठान 2' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटात साऊथ चित्रपटसृष्टीमधील एक चेहरा दिसणार आहे.

Pathaan 2
पठाण 2 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 4:47 PM IST

मुंबई - Pathaan 2 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं 2023 मध्ये 'पठाण' या चित्रपटाद्वारे धमाकेदार पुनरागमन केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट झाला होता. यानंतर शाहरुखनं 2023 रोजी 'जवान' आणि 'डंकी' देऊन पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होता. आता चाहते त्याच्या 'पठाण 2'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 'पठाण'पेक्षाही मोठा ॲक्शनपट बनवण्याची तयारी सुरू आहे. आता 'पठाण 2' मधून दोन मोठे अपडेट्स येत आहेत. दरम्यान 'बाहुबली' या चित्रपटापासून साऊथ सिनेसृष्टी सतत बॉलिवूडवर वर्चस्व गाजवत आहे. हिंदी पट्ट्यातील प्रेक्षक आता साऊथ चित्रपट पाहू लागले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पठाण 2'मध्ये दिसणार साऊथचा चेहरा : अनेक बॉलिवूड कलाकार साऊथ चित्रपटसृष्टीत जाऊन साऊथच्या दिग्दर्शकांबरोबर काम करत आहेत. रिपोर्ट्सवर 'पठाण 2' यशराज बॅनरचे निर्माते आता या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत साऊथकडील अभिनेता कास्ट करण्याचा विचार करत आहेत. सध्या कोणाचेही नाव समोर आलेले नाही, जर असं झाल्यास 'पठाण 2' बॉक्स ऑफिसवर कमाईचे वादळ निर्माण करेल. 'पठाण' चित्रपटाचं दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केलं होतं. त्यांनी हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' ॲक्शन चित्रपट बनवला होता. दरम्यान 'वॉर 2'च्या दिग्दर्शनाचे काम सिद्धार्थकडून हिसकावून घेऊन 'ब्रह्मास्त्र' दिग्दर्शक अयान मुखर्जीला देण्यात आलं आहे.

शाहरुख खानचा आगामी चित्रपट : 'पठाण 2' देखील त्याच्याकडून हिसकावण्यात आला असल्याचं समजत आहे. निर्मात्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान 'पठाण' चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. शाहरुखच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'किंग'मध्ये झळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय तो पुढं 'लायन' आणि 'जवान 2' चित्रपटामध्ये दिसणार आहे. सध्या दोन्ही चित्रपट खूप चर्चेत आहेत.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणूक 2024 जिंकल्यानंतर कंगना रणौत करणार बॉलिवूडला टाटा बाय बाय... - kangana ranaut
  2. रवीना टंडनची मुलीसह ज्योतिर्लिंग यात्रा, भीमाशंकर मंदिरात घेतलं दर्शन - Raveena Tandon and Rasha
  3. करण जोहरची नक्कल केल्यानंतर कॉमेडियन केतन सिंगनं मागितली माफी, एकता कपूरनं केलं समर्थन - Karan johar ekta kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.