मुंबई - SRK AT EDEN GARDEN : 14 एप्रिल हा दिवस कोलकाता नाईट रायडर्ससाठी महत्त्वाचा ठरला. या संघानं पश्चिम बंगालच्या कोलकातातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. स्टेडियमवर शाहरुख खान, त्याचा मुलगा अबराम खान, त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे त्यांच्या टीमला सपोर्ट करताना, आनंद लुटताना दिसले. शाहरुख त्याचा मुलगा अबरामबरोबर विजय साजरा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केल्यानंतर, काळी बॅगी पॅन्ट आणि कोलकाता नाइट रायडर्सची जर्सी परिधान केलेल्या शाहरुख खाननं विजयानंतर मैदानात प्रवेश केला. यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मुलगा अबरामही होता. यावेळी त्यानं उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केलं आणि खेळाडूंचं अभिनंदन केलं.
विजयाचा आनंद साजरा करताना,अबरामनं प्रेक्षकांना "थम्स अप" देखील केलं आणि जल्लोष करणाऱ्या गर्दीला साद दिली. केकेआरसाठी हा मोठा विजय होता आणि अबराम संपूर्ण वेळ हा विजय साजरा करत होता. त्याचे वडील शाहरुख खानच्या आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात एलएसजीला पराभूत केल्यानंतर अभिनेत्री सुहाना खानलाही आनंद झाला. तिनं इंस्टाग्रामवर तिची बेस्ट फ्रेंड अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर स्टँडवरून काढलेली अनेक फोटो पोस्ट करून तिनं आपला आनंद व्यक्त केला.
कामाच्या आघाडीवर शाहरुख खानला 2023 हे वर्ष खूपच लाभदायक ठरलं. या वर्षात रिलीज झालेल्या त्याच्या 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तिनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला. शाहरुख खान आगामी काळात दिग्दर्शक राज आणि डीके, फराह खान, कबीर खान आणि सिद्धार्थ आनंद यांच्याशी चर्चा करत आहे. याव्यतिरिक्त, शाहरुख आता किंग चित्रपटासाठीची तयारी करत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटात सुहाना खान आणि तो पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या थ्रिलर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सुजॉय घोषला आमंत्रित केले गेलं आहे, तर सिद्धार्थ आनंद सह-निर्माता म्हणून सामील झाला आहे.
हेही वाचा -
- रजनीकांतच्या 'थलैयवा 171' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री? बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो भुकंप - Thalaiyava 171
- शाहरुख चमकला, तापसी लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली, स्टार स्टडेड पार्टीत इम्रान हाश्मीची मल्लिकाशी भेट - ANAND PANDIT PARTY
- सलमान, शाहरुख आणि आमिरनं एकत्र काम करण्यासाठी, ''हीच योग्य वेळ !'': आमिरचे स्पष्ट संकेत