मुंबई - अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानची माजी पत्नी सीमा सजदेह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सीमाचं नाव सध्या 'फॅबुलस लाइव्स वर्सेस बॉलिवूड वाइव्स'मध्ये पाहायला मिळत आहे. सीमा सजदेहनं मुलाखतीदरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. यात तिनं, सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती एका श्रीमंत उद्योगपतीला डेट करत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय आधी ती या उद्योगपतीशी लग्न करणार होती, याबद्दल तिनं यात उघड केलंय. आता तिचा मुलगा निर्वाण खानला सीमाच्या कथित अफेअरची कोणतीही अडचण नसल्याची माहिती देऊन तिनं सर्वांना चकित केलंय.
सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान आईसाठी खुश : सीमानं मुलाखतीदरम्यान म्हटलं की, निर्वाणला नवीन नात्यात कोणतीही अडचण नाही. तो म्हणाला की, "मम्मा तुला जोडीदाराची गरज आहे, आणि त्यात काही अडचण नाही, तू आनंदी आहेस, तर आम्हीही आनंदी आहोत, किती दिवस तू तुझं आयुष्य असं ताणतणावात काढणार आहे. हे माझ्यासाठी देखील तणावपूर्ण आहे. सीमानं तिचा मुलगा निर्वाणकडून तिचा नवीन जोडीदार विक्रम आहुजासाठी अप्रूवल घेतलं आहे. सीमानं पुढं सांगितलं की, "विक्रम तिच्यापेक्षा एक वर्षानं मोठा आहे, निर्वाण मला म्हटल की "हे चांगलं आहे, मला काही तुमच्या नात्याबद्दल प्रॉब्लम नाही."
विक्रम आणि सीमा यांची एंगेजमेंट झाली : सोहेलबरोबर लग्न करण्यापूर्वी विक्रम आणि सीमा यांची एंगेजमेंट झाली होती. सीमानं पुढं म्हटलं , "कोणाला याबद्दल माहीत नसेल, सोहेलशी लग्न करण्यापूर्वी विक्रम आणि माझी एंगेजमेंट झाली होती, आज पुन्हा आम्ही भेटलो आहोत, आयुष्य पुन्हा फुल्ल सर्कलमध्ये आलं आहे." सीमा आणि सोहेलनं 1998 मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. जवळपास दोन दशके एकत्र घालवल्यानंतर सीमा आणि सोहेलनं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सीमा ही निर्वाण आणि योहान यांच्याबरोबर राहत असून ती अनेकदा आपल्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.