ETV Bharat / entertainment

'ड्रीम गर्ल 3'मधून अनन्या पांडेचा पत्ता कट 'चकचक गर्ल' आयुष्मान खुरानाबरोबर करणार धमाल - sara replaces ananya - SARA REPLACES ANANYA

Dream Girl 3 Actress : ड्रीम गर्ल फ्रँचायझीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात सारा अली खानची एंट्री होणार असल्याचं समजत आहे.

Dream Girl 3 Actress
ड्रीम गर्ल 3 अभिनेत्री
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 4:25 PM IST

मुंबई - Dream Girl 3 Actress : अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर कॉमेडी ड्रामा चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' गेल्या वर्षी रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटामधील अनन्या पांडेचा अभिनय काही प्रेक्षकांना आवडला नव्हता, याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितलं होतं. आता ड्रीम गर्ल फ्रँचायझीकडून एक मोठे अपडेट समोर आली आहे. 'ड्रीम गर्ल 3' या चित्रपटावर सध्या काम सुरू झालं आहे. यावेळी या चित्रपटातून अनन्या पांडेला वगळण्यात आलं आहे. या बातमीवर निर्मात्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'ड्रीम गर्ल 3'मध्ये सारा अली खाननची एंट्री : रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये सारा अली खान अनन्या पांडेची जागा घेणार आहे. ड्रीम गर्ल फ्रँचायझीच्या पहिल्या भागात अभिनेत्री नुसरत भरुचा होती. तिची जागा 'ड्रीम गर्ल 2' मध्ये अनन्या पांडेनं घेतली होती. आता 'ड्रीम गर्ल 3'मध्ये सारा अली खान झळकणार आहे. आयुष्मान आणि सारानं 'ड्रीम गर्ल 3' च्या निर्मात्यांबरोबर एक अधिकृत बैठक घेतली आहे. आता सारा ही बॉलिवूडची पुढची ड्रीम गर्ल बनणार आहे. ही बातमी समोर येताच साराचे चाहते याबद्दल खूप खुश झाले आहेत. 'ड्रीम गर्ल ' आणि 'ड्रीम गर्ल 2'नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांना तिसऱ्या भागाकडून देखील खूप अपेक्षा आहेत.

'ड्रीम गर्ल' फ्रँचायझीबद्दल : 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट 2019 साली आला होता, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं. चित्रपटातील प्रत्येक पात्र खूप मजेदार असून, या चित्रपटानं प्रेक्षकांच खूप मनोरंजन केलं होत. 'ड्रीम गर्ल' चित्रपटामध्ये अन्नू कपूर हा आयुष्मान खुरानाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटामध्ये या दोन्ही कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. 25 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल 2' हा पाहिजे तसे यश मिळवू शकले नाही. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट होता, मात्र निर्मात्यांचा अपेक्षेपेक्षा यानं कमी कमाई केली. 'ड्रीम गर्ल'चं दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. वरुण धवननं कुटुंबाबरोबर शेअर केला 37वा वाढदिवस, फोटो व्हायरल... - varun dhawan
  2. शाहरुख खानसाठी मोहनलालच्या घरी होणार डिनर पार्टी, 'जिंदा बंदा'वर थिरकणार दोन सुपरस्टार्स? - Shah Rukh Khan
  3. 'लाहोर 1947' चित्रपटाद्वारे प्रीती झिंटा करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन, फोटो व्हायरल - preity zinta

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.