ETV Bharat / entertainment

संत मुक्ताबाईंचं प्रेरणादायी चरित्र 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Sant Dnyaneshwaranchi Muktai

Saint Muktai Biography : संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना सांभाळण्याचं काम त्यांची बहिण मुक्ताईनं केलं. आपल्या साध्या जगण्यातून अर्थपूर्ण विचारांचं योगदान देणाऱ्या मुक्ताईंच्या जीवनावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होईल.

Sant Dnyaneshwaranchi Muktai
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई (Sant Dnyaneshwaranchi Muktai PR team)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 3:50 PM IST

मुंबई - Saint Muktai Biography : महाराष्ट्राचा आध्यात्मिक पाया भक्कम करण्यामध्ये वारकरी संप्रदायाचं सर्वा मोठं योगदान आहे. वारकरी संप्रदायामधील संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानलं जातं. पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर हे अनन्य साधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाई यांच्यावर पडली. तिनं आईच्या निसर्गदत्त मायेनं ती पेलली. आपल्या भावंडांची जणू ती आईचं झाली. पुढं मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची अध्यात्मिक गुरु बनली. मुक्ताबाईंचं साधेपण अर्थपूर्ण विचार आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतात आणि स्त्री मुक्तीची वेगळीच जाणीव निर्माण करत प्रेरणाही देतर रहातात.

Sant Dnyaneshwaranchi Muktai
संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई (Sant Dnyaneshwaranchi Muktai PR team)

अशा संत मुक्ताबाईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अलौकिक भावंडांच्या भूमिकेत नेमकं कोण असणार, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका पोस्टरमधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची चैतन्यमय झलक पहायला मिळाळी आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताच्या भूमिकेत चिमुकली ईश्मिता जोशी दिसत आहे.

मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचं नातं विलक्षण होतं. मुक्ताई ज्ञानेश्वरांची कधी माता बनायची, कधी बहीण, तर कधी शिष्या बनायची. ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईनं त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केलं, तर प्रसंगी तिनं ज्ञानेश्वरांना उपदेशही केला. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई।।’ असं वर्णन केलं आहे.

मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचं सिद्ध जीवन होतं. छोट्या आयुष्यात या जगन्मायेनं संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचं क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला.‘मुक्ताई’नं निभावलेल्या माता ,भगिनी, गुरु अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून उलगडणार आहेत.

या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचं आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांची आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

हेही वाचा -

  1. 'कोटा फॅक्टरी' सीझन 3 च्या रिलीजची तारीख क्रॅक करण्यासाठी जितेंद्र कुमारनं घातलं चाहत्यांना कोडं - Kota Factory
  2. सनी देओलवर फसवणूकीसह खंडणीचा आरोप, चित्रपट निर्मात्याचा धक्कादायक खुलासा - Sunny Deol
  3. लवकरच प्रदर्शित होणारे 10 कॉमेडी चित्रपट तुम्हाला करतील टेन्शन फ्री, पाहा रिलीज तारखा - Top ten Coming Soon Comedy Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.