ETV Bharat / entertainment

चित्रपटाची भव्यता ओटीटीमध्येदेखील अनुभवता येणार, संजय लीला भन्साळींची वेब सिरीज 'या' तारखेला होणार रिलीज - hiramandi the diamond bazaar - HIRAMANDI THE DIAMOND BAZAAR

Hiramandi The Diamond Bazaar: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पहिलीच वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'हिरामंडी: द डायमंड बाजार' ही वेब सिरीज प्रदर्शित होण्याची तारीख दिग्दर्शक भन्साळी यांनी जाहीर केली आहे.

Hiramandi The Diamond Bazaar
हिरमंडी: द डायमंड बाजार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 12:03 PM IST

मुंबई - Hiramandi The Diamond Bazaar: 'हिरामंडी द डायमंड बाजार' ही वेबसिरीज प्रदर्शित होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. नेटफ्लिक्स आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरील एका भव्य ड्रोन शोमध्ये 'हिरामंडी: द डायमंड बाजार'च्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली. 1 मे 2024 रोजी या वेब सीरीजचा प्रीमियर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरीजमध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, संजीदा शेख आणि रिचा चढ्ढा हे कलाकार दिसणार आहेत. 'हिरामंडी' रिलीजची तारीख जाहीर करण्यासाठी 1000 ड्रोन वापर करण्यात आला होता.

संजय लीला भन्साळी यांनी मानले आभार : प्रीमियरच्या तारखेची घोषणा करताना, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी म्हटलं, ''हिरामंडी: द डायमंड बाजार' नेटफ्लिक्सवर आणण्यासाठी आणि समर्पणाबद्दल मी संपूर्ण टीमचं आभार मानू इच्छितो. ही वेब सीरीज 1 मे रोजी रिलीज होत आहे. आम्ही जगभरातील प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहणार आहोत.'' भव्य ड्रोन शोमध्ये, घुंघरू आणि झारोखा या वेब सीरीजतील घटक दाखवण्यात आले होते. ही वेब सीरीज ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहोरमधील हिरामंडी रेड-लाइट भागातील मुलींच्या जीवनाबद्दल आहे. ही वेब सीरीज खूप दिवसापासून चर्चेत होती.

'हिरमंडी' वेब सीरीजमधील पहिलं ट्रॅक : 'हिरमंडी'च्या कहाणीबद्दल बोलायचं झालं तर यात मल्लिकाजन (मनीषा कोईराला) आणि फरीदान (सोनाक्षी सिन्हा) यांच्यातील ताणलेले संबंध दाखविण्यात आले आहेत. या वेब सीरीजमधील पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर मिस वर्ल्डच्या जागतिक मंचावर लॉन्च करण्यात आलं होतं. भन्साळी प्रॉडक्शनच्या नवीन म्युझिक लेबल, 'भन्साळी म्युझिक'चा हा पहिलाच ट्रॅक आहे. 'सकल बन' असे शीर्षक असलेलं हे गाणं खूप आकर्षक आहे. भन्साळी यांनी या वेब सीरीजला आपला सर्वात मोठा प्रोजेक्ट असल्याचं म्हटलंय. भन्साळी या वेब सीरीजसाठी खूप उत्सुक आहेत. या वेब सीरीजमधील भव्यता राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'देवदास', 'सावरिया' आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसारखी आहे.

हेही वाचा :

  1. श्रेयस तळपदे, विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर 'कर्तम भुगतम'ची रिलीज तारीख जाहीर - Kartam Bhugtam
  2. आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' वेब सीरीजच्या शूटिंग सेटवरचा व्हिडिओ व्हायरल - Aaryan Khan and Stardom web series
  3. सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी झाले विवाहबद्ध! मंदिरात बांधल्या रेशीमगाठी - Siddharth and Aditi Rao Hydari

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.