ETV Bharat / entertainment

शरद केळकरचा उग्र अवतार असलेला मराठी चित्रपट 'रानटी', संजय दत्तनं शेअर केला टिझर

Raanti teaser : भरपूर डायलॉगबाजी, अ‍ॅक्शन आणि हिंसा असलेला 'रानटी' या मराठी चित्रपटाची झलक संजय दत्तनं शेअर केली आहे. शरद केळकर यात आक्रमक भूमिकेत आहे.

Raanti teaser
मराठी चित्रपट 'रानटी' (Raanti poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 26, 2024, 12:54 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खलनायक संजय दत्तनं शनिवारी शरद केळकर अभिनीत 'रानटी' या मराठी चित्रपटाची झलक शेअर केली आहे. यामध्ये एका शक्तीशाली भूमिकेत शरद दिसत आहे. आक्रमक भूमिका असलेला शरद केळकरचा हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. समित कक्कर दिग्दर्शित या चित्रपटातून एका अँग्री एंग मॅनच्या भूमिकेत शरद केळकर मराठी चित्रपटात पहिल्यांदाच दिसत आहे.

टिझरची सुरुवात लालभडक वातावरणात सुरू होते. 'पाताळपूर' या काल्पनिक गावाची पार्श्वभूमी असलेल्या या कथानकात रक्तरंजीत कहानी पाहायला मिळणार हे टिझरवरुन स्पष्ट होतं. झलकच्या सुरुवातीलाच शरद केळकरचा धीरगंभीर व्हाईस ओव्हर सुरू होतो. यामध्ये तो म्हणतो, "पाताळपूर.. इथं बोटीहून जास्त मुडदे जास्त तरंगतात. या समुद्राचं पाणी रक्तानं लाल झालंय. हे नाव नाही तर बदनाम नाव आहे. राक्षसांना पोसणारं, हे पाताळपूर आहे. 'मारा किंवा मरा' हा एकच रुल, म्हणून मला हत्यार उचलावं लागलं. हिंसक व्हावं लागलं. 'शांत वारा असतो वादळ नाही, मी तर तुफान आहे'. आणि हा अवतार घेतलाय तो सूड घ्यायला. माझ्या नजरेत 'राडा आणि हातात फाईट, आपण फुल्ल ऑन डेंजर डोन्ट टेक मी लाइट." असे डायलॉग ऐकू येतात.

या टिझरमधून रानटीतील इतर कलाकारांची झलकही पाहायला मिळते. संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, नागेश भोसले, हितेश भोजराज आणि अभिनेत्री शानवी श्रीवास्तव यांच्या मुख्य भूमिका यामध्ये असणार आहेत. पुनित बालन यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित कक्कड यांनी केलं आहे. रानटीचं टिझर संजय दत्तनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. "दशकातील सर्वात शक्तिशाली मराठी चित्रपट 'रानटी'चा अधिकृत टीझर सादर करत आहे!

खरंतर मराठी चित्रपटात कथानकाला जास्त महत्त्व दिलं जात. मर्यादित हिंसा बनवण्याची आजवरची मराठीत प्रथा आहे. असे भडक विषय असलेले चित्रपट बनवण्याचा प्रयत्न यापूर्वी मराठी सिनेसृष्टीत झालेला असला तरी त्याला यश मिळालेलं नाही. यापार्श्वभूमीवर 'रानटी'चा हा टिझर आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय की नाही याचा निकाल 22 नोव्हेंबरला रिलीज नंतरच लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.