ETV Bharat / entertainment

'हाऊसफुल 5'च्या कलाकारांमध्ये संजय दत्त झाला सामील, साजिद नाडियाडवाला यांनी केली पुष्टी - Sanjay Dutt

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 2:43 PM IST

Sanjay Dutt In Housefull 5: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनं अक्षय कुमार आणि रितेश देशमुख स्टारर 'हाऊसफुल 5' या चित्रपटात एंट्री केली आहे. अलीकडेच साजिद नाडियादवाला यांनी याला दुजोरा दिला आहे.

Sanjay Dutt In Housefull 5
हाऊसफुल ५मध्ये संजय दत्तची एंट्री (हाउसफुल 5 (IANS))

मुंबई - Sanjay Dutt in Housefull 5: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त मोस्ट अवेटेड 'हाऊसफुल 5' चित्रपटात दिसणार आहे. या कॉमेडी फ्रँचायझीबद्दल चाहत्यांमध्ये आणखीनच उत्सुकता वाढली आहे. साजिद नाडियादवाला दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'हाऊसफुल 5' निर्माता साजिद नाडियादवाला यांनी इन्स्टाग्रामवर संजय दत्त कलाकारांमध्ये सामील झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. नाडियाडवाला ग्रँडसन प्रोडक्शन हाऊसनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये साजिद नाडियादवाला आणि संजय दत्त एकत्र दिसत आहेत.

साजिद नाडियादवाला केली घोषणा : या पोस्टवर त्यांनी लिहिलं, "संजय दत्त 'हाऊसफुल 5' कुटुंबात सामील होत असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. वेडेपणानं भरलेल्या आणखी एका रोमांचक प्रवासासाठी सज्ज व्हा." याशिवाय पुढं यात लिहिलंय, "संजय दत्त माझ्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच, मला कुटुंबासारखा वाटला आहे. त्याच्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्या त्याला सर्वोत्कृष्ट माणसांपैकी एक बनवतात, मी याआधी त्याच्याबरोबर काम केलंय. आता 'हाऊसफुल 5' मध्ये पुन्हा एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आता यामुळे संजय दत्त चाहते खूप खूश आहेत.

संजय दत्त या चित्रपटासाठी उत्सुक : यावर संजय दत्तन म्हटलं, "मी साजिदला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतो, जेव्हा तो असिस्टंट असायचा आणि त्याला अशा प्रकारे वाढताना आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्तम निर्मात्यांपैकी एक बनताना पाहण्याचा अनुभव खूप चांगला आहे. साजिद माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे. गेल्या काही वर्षांत आमची मैत्री अधिक घट्ट झाली आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये त्याच्याबरोबर पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे आणि येत्या काही वर्षांत त्याच्याबरोबर आणखी बरेच सहकार्य करण्याची आशा आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित, 'हाऊसफुल 5' हा हाऊसफुल' फ्रँचायझीचा एक सर्वात मोठा भाग असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन आणि आता संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट क्रूझ जहाजावर शूट केला जाईल. 'हाऊसफुल 5' 6 जून 2025 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. जॉन अब्राहम, बॉबी देओल आणि अर्जुन रामपालची हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये पुन्हा एन्ट्री - Housefull 5 Movie
  2. अभिषेक बच्चन 'हाउसफुल 5' च्या स्टार स्टडेट कास्टमध्ये परतणार, साजिद नाडियाडवालाची घोषणा - Housefull 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.