ETV Bharat / entertainment

मायोसिटिसचे निदान होण्यापूर्वीचे एक वर्ष अत्यंत अशांत होते, सामंथाचा खुलासा - सामंथा मायोसिटिस

सामंथा रुथ प्रभू हिच्यासाठी मायोसिटिसचे निदान होण्याआधीचे एक वर्ष खूपच अशांत आणि त्रासदायक होते. तिने आपल्या पॉडकास्टमध्ये तिचा आरोग्य प्रवास आणि ती स्वयंप्रतिकार स्थिती कशी हाताळत आहे हे शेअर केले.

Samantha
सामंथा रुथ प्रभू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 12:06 PM IST

मुंबई - सामंथा रुथ प्रभूचे काही महिन्यापूर्वी मायोसिटिस या आजाराचे निदान झाले होते. हा काळ तिच्यासाठी खूपच त्रासदायक असला तरी त्याच्या अगोदरचे पूर्ण वर्ष तिच्यासाठी याहून अधिक त्रासदायक होते, याबद्दलचा खुलासा तिने केला आहे. आजाराचे निदान होण्यापूर्वी गेलेल्या वेदनादायी वर्षानंतर तिने काही काळ शांतता आणि आरामाचा अनुभव घेतला. तिचा मित्र असलेला व्यवस्थापक आणि पार्टनर हिमांकसह ती प्रवास करत असतानाचा एक क्षण तिच्या मनाला खूपच शांतता देणारा होता.

सामंथाने स्पष्ट केले की, "मला खास करुन आठवते की मला या आजाराची समस्या येण्यापूर्वीचे वर्ष, माझ्यासाठी अत्यंत कठीण वर्ष होते. मला तो दिवस आठवतो ज्यादिवशी मी माझा मित्र हिमांकसह गेल्या जूनमध्ये मुंबईहून परत येत होते. मला आठवते, मी त्याला सांगितले होते की शेवटी मला आता शांत वाटत आहे. मला खूप, खूप दिवसांपासून थोडे आराम आणि शांत वाटले नव्हते आणि शेवटी मला असे वाटते की मी श्वास घेऊ शकते आणि मी मी झोपू शकते. मी आता उठून माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेन आणि मी कामावर सर्वोत्तम देऊ शकेन. या स्थितीने मी जागे झाले."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

तिच्या पॉडकास्ट मालिकेमध्ये बोलताना सामंथाने तिच्या आरोग्याच्या प्रवासावर पुढे चर्चा केली. तिने सांगितले की, "मला हे पॉडकास्ट करायचे कारण म्हणजे मी अनुभवलेल्या त्रासदायक अनुभवानंतर एक स्वयंप्रतिकार स्थिती आयुष्यभर टिकते, म्हणून मी सध्या ज्या गोष्टींचा सामना करत आहे, त्यानुसार मी माफ करण्यापेक्षा लोक सुरक्षित असावेत असे मला जास्त वाटते."

गेल्या वर्षी, समांथाने इन्स्टाग्रामवर तिचे मायोसिटिसचे निदान झाल्याचा खुलासा केला होता. तिने तिचा प्रवास आणि ते स्वीकारण्याची आव्हाने शेअर करताना असुरक्षितता व्यक्त केली, "ही असुरक्षितता स्वीकारणे ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी मी अजूनही संघर्ष करीत आहे." तिच्या आरोग्याची आव्हाने असूनही, सामांथाने तिच्या कामावर परत येण्याची घोषणा केली आहे. तिच्या आगामी प्रकल्पांबाबत बोलायचे तर राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी तयार केलेल्या 'सिटाडेल' या अमेरिकन मालिकेच्या भारतीय रूपांतरामध्ये सामंथा वरुण धवनसोबत काम करणार आहे.

हेही वाचा -

  1. अभिनेता ऋतुराज सिंगचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  2. अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम
  3. रणवीर सिंगच्या 'डॉन 3' बद्दल फरहान अख्तरची मोठी अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.