ETV Bharat / entertainment

डिलीट केलेल्या फोटोवर भाष्य करण्यासाठी सामंथा रुथ प्रभूने शेअर केली 'गूढ पोस्ट' - Samantha Ruth Parbhu - SAMANTHA RUTH PARBHU

Samantha Ruth Parbhu : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने तिचा एक मॉर्फ केलेला फोटो ऑनलाइन प्रसारित झाल्यानंतर युजर्सचे तुफान लक्ष वेधले. अनेकांना असं वाटतं की सामंथानं तिचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आणि नंतर तो हटवला. त्यानंतर तिनं एक गूढ पोस्ट लिहून सर्व अफवांना विश्रांती दिली आहे.

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू (( Photo courtesy Samantha Ruth Prabhu Instagram ))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 10:50 AM IST

मुंबई - Samantha Ruth Parbhu : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. तिनं पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी नंतर हटवण्यात आल्यानंतर फॉलोअर्समधील उत्सुकता चाळवली आहे. त्या पोस्टमध्ये काय होतं ही बाब गुलदस्त्यात असली तरी सामंथाच्या एका व्हायरल फोटोभोवती सुरू असलेल्या चर्चेमध्ये नेटिझन्समध्ये दोन गट पडले आहेत. काही युजर्सना वाटतं की, सामंथाने चुकून बाथटबमधील स्वतःचा फोटो शेअर केला आणि नतर तो हटवला. तर काहींना वाटते की, मार्फ केलेला फोटो काही बदमाशांनी ऑनलाईन प्रसारित केला. सध्या सुरू असलेल्या वादावर सामंथाने प्रतिक्रिया दिली आहे.

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभूने शेअर केली 'गूढ पोस्ट' (Samantha Ruth Prabhu Instagram Story Post)

इंस्टाग्रामवर सामंथाने एक गूढ पोस्ट शेअर केली, यामध्ये तिनं तिला तिची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही, असं म्हटलंय. पोस्टमध्ये असे लिहिले आहे: "वास्तविक फ्लेक्स म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही तर स्वतःला अस्तित्वात ठेवण्यासाठी परवानगी देणं आहे." सामंथानं बाथटबमधील स्वतःचा फोटो 'शेअर आणि डिलीट' केल्याची चर्चा तिच्या सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर तिनं ही पोस्ट केली आहे.

Samantha Ruth Parbhu
सामंथा रुथ प्रभू इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट (Samantha Ruth Prabhu Instagram Story Post)

हा फोटो व्हायरल झाल्यानं, तिच्या चाहत्यांनी तातडीनं हा फोटो बनावट असल्याचे उघड केले आणि ते पसरवणाऱ्या सोशल मीडिया युजर्सना धडा शिकवला. सामंथानं रविवारी तिच्यावर सुरू असलेल्या उपचार पद्धती फोटोसह इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यानंतर या चर्चेला उधाण आले. अभिनेत्री सामंथा एका क्लिनिकमध्ये बसलेली दिसत असून, तिच्या ऑटो-इम्यून डिसऑर्डरसाठी नवीन उपचार घेत आहेत.

सामंथानं दावा केला की ती 'फार इन्फ्रारेड सौना' थेरपी वापरून पाहत आहे. "बरं होण्यासाठी सतत पर्यायी पध्दतींचा शोध घेत आहे," असं तिनं उपचार घेत असतानाच्या स्वत:च्या फोटोला कॅप्शन दिलंय. अपडेटबरोबरच तिनं सौना थेरपीचा अधिकचा फायदा सांगताना ठळकपणे लिहिलंय, "स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुधारते, चयापचय वाढवते, शरीरातील चरबी कमी करते, ऊर्जा वाढवते, शरीर डिटॉक्सिफाय करते, सेल्युलाईट कमी होते, त्वचेला पुनरुज्जीवित करते, ताकद वाढते, घाम वाढतो, सांधे आणि स्नायू दुखणे कमी होते आणि लवचिकता वाढते."

सामंथाच्या पोस्टने तिच्या तब्येतीबद्दल चाहत्यांना दिलासा दिलेला असताना काही युजर्सनी तिचा मॉर्फ केलेला फोटो प्रसारित केला. ते म्हणतात की सामंथाने फोटो हटवण्यापूर्वी शेअर केला. तिच्या समर्थकांनी तो एडिट केलेला फोटो असल्याचे दाखवून दिले आणि बोगस फोटो शेअर करणाऱ्या लोकांना सुनावले.

कामाच्या आघाडीवर सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीत गुंतली आहे. 'सिटाडेल : हनी बनी' या लोकप्रिय अमेरिकन गुप्तचर मालिका 'सिटाडेल'चे भारतीय रुपांतर आहे. राज आणि डीके दिग्दर्शित या मालिकेत ती वरुण धवनबरोबर भूमिका साकारत आहे.

हेही वाचा -

  1. तमन्ना भाटिया स्टारर 'अरनमनाई 4'मधील विजय वर्मानं केलं पोस्टर शेअर - vijay varma share post
  2. प्रियांका चोप्रानं करीना कपूरला युनिसेफ इंडियाची नेशनल ॲम्बेसेडर बनल्यानंतर दिल्या शुभेच्छा - Priyanka Wishes Kareena
  3. शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या 'क्षितीज'चा मनोरंजन जगतात होता दबदबा - Kshitij Zarapkar passed away

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.