मुंबई -Samantha Ruth Prabhu : साऊथ फिल्म इंडस्ट्रीची सुंदर अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू जगभरात प्रसिद्ध झाली आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' चित्रपटातील आयटम नंबर 'ऊं अंटावा'मध्ये ती दिसली होती. यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली. या गाण्यानं सामंथाला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली, यात शंका नाही. आज हे गाणे अनेक कार्यक्रमात वाजवले जाते. आता सामंथानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'ऊं अंटावा' या ब्लॉकबस्टर गाण्यावर लहान मुली नाचताना दिसत आहेत. या तीन मुलींचा डान्स पाहून आता अनेकजण या व्हिडिओच्या पोस्टमध्ये प्रतिक्रिया देत आहेत.
काय म्हणाली सामंथा ? : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तीन मुली एका कार्यक्रमात 'ऊं अंटावा' गाण्यावर परफॉर्म करत आहेत. या तीन मुलींपैकी एका मुलीनं खूप सुंदर डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही मुलगी पहिल्या क्रमांकावर असून ती सुंदर डान्स करत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सामंथानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कदाचित मी आणखी चांगला डान्स करायला हवा होता.' या कॅप्शनसह सामंथानं हसतमुख आणि हार्ट इमोजी शेअर केले आहे. याशिवाय आता या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

सामंथानं हा आयटम नंबर का केला? : घटस्फोटित सामंथानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हे लोकप्रिय गाणे करण्यामागील कारण तिला स्वतःला एक्सप्लोर करायचं होतं. पुढं तिनं म्हटलं होतं, 'ऊं अंटावा' हे गाणे करण्याचा निर्णय अगदी तसाच होता, जेव्हा मी 'द फॅमिली' चित्रपटाला होकार दिला होता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या दोन्ही निर्णयात मी कोणाचे मत घेतले नाही. मी माझ्या स्वत:विषयी आत्मविश्वास बाळगू शकली नाही, मला नेहमी वाटायचे की मी सुंदर नाही आणि माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, त्यामुळे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होतं.'
हेही वाचा :