ETV Bharat / entertainment

सलमान खानपाठोपाठ सुपरस्टार शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी, फोन नेमका आला कुठून? - SHAH RUKH KHAN

सुपरस्टार किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान यालाही जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. यामुळं सिनेसृष्टीत एकच खळबळ उडालीय.

शाहरुख खान
Shah Rukh Khan (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2024, 2:18 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान यांच्या वांद्रे येथील राहत्या घरावर बिश्नोई गँगनं गोळीबार केला होता. यानंतर बिश्नोई गँगकडून सलमान खान याला दोन वेळा जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता सुपरस्टार किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान यालाही जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. यामुळं सिनेसृष्टीत एकच खळबळ उडालीय.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण ताजे असताना आणि धमकी देणाऱ्या आरोपींच्या शोधात पोलीस असताना आता किंग खान अर्थात सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानलाही जीवे मारणाच्या धमकीचा फोन आलाय. रायपूर इथून फैजान या व्यक्तीने धमकीचा फोन केला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. त्यामुळं पोलीस अधिक तपास करीत असून, याबाबत वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरं तर याबाबत अधिकचा तपास मुंबई पोलीस करताहेत. दरम्यान, याबाबत तपास आणि चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस रायपूरकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

मन्नतबाहेर सुरक्षा वाढवली : अभिनेता शाहरुख खान याला धमकीचा फोन आल्यानंतर शाहरुख खानच्या वांद्रे बँडस्टँड परिसरातील मन्नत या बंगल्याबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इथे शाहरुख खानचे चाहते मोठ्या प्रमाणात फोटो काढण्यासाठी येत असतात. मात्र या धमकीच्या फोननंतर सध्या येथे चाहत्यांना फोटो काढण्यास मनाई केलीय. तसेच ज्या रायपूरमधून फैजान नावाच्या व्यक्तीने फोन केला होता, त्याचा शोध घेण्यासाठी सध्या मुंबई पोलिसांचे एक पथक रायपूरच्या दिशेने रवाना झाल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिलीय.

वांद्रे पोलीस ठाण्यात अभिनेता शाहरुख खानला धमकी देणारा आणि 50 लाख रुपयांची मागणी करणारा फोन आलाय. वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, तपास सुरू आहे.

- दीक्षित कुमार गेडाम, पोलीस उपायुक्त

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीत मजुरांना 'अच्छे दिन'; नेमकी भानगड काय?
  2. उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी . . नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.