मुंबई - Salman khan and Sikandar shoot : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 18 जूनपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली. 'गजनी' दिग्दर्शक ए आर मुरुगोदास हे 'सिकंदर'चं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खान ॲक्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. सलमान खानला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट सलमान खानच्या करिअरसाठी संजीवजी म्हणून काम करेल असं अनेकांना वाटत आहे. दरम्यान, 'सिकंदर'च्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेटवरीलच्या या फोटोमध्ये निर्माता साजिद नाडियादवाला कॅमेऱ्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.
![Salman khan and Sikandar shoot](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-06-2024/21743726_3.jpg)
'सिकंदर'च्या सेटवरील फोटो झाले व्हायरल : अद्याप सेटवरून सलमान खानची झलक दिसली नाही. येणाऱ्या काळात 'सिकंदर'च्या सेटवरून सलमानची झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 'सिकंदर'च्या सेटवरील फोटो प्रॉडक्शन हाऊस नाडियादवाला ग्रँडसनच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले गेले आहेत. या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना, प्रतिक पाटील बब्बर मुख्य भूमिकेत असून चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. सलमान खानचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. सलमानच्या चाहत्यांना 'सिकंदर'च्या रिलीजसाठी बरीच वाट पाहावी लागणार आहे.
![Salman khan and Sikandar shoot](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-06-2024/21743726_1.jpg)