मुंबई - बॉलिवूडचे प्रख्यात निर्माता साजिद नाडियादवालाने आज ४ ऑक्टोबर रोजी त्याच्या आगामी 'किक २' या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. इतकंच नाही तर निर्मात्याने चित्रपटाच्या सेटवरून सलमान खानचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. सोशल मीडियावर झळकलेल्या या फोटोमुळे भाईजानच्या चाहत्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे.
4 ऑक्टोबर रोजी निर्माता साजिद नाडियादवालाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'किक 2' चित्रपटामधील सलमान खानचा फोटो शेअर केला. 'डेविल'चे मोनोक्रोम फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'सिकंदरचे 'किक 2' फोटोशूट अप्रतिम होते. ग्रँड, साजिद नाडियादवाल यांच्याकडून.
'किक २' मधील सलमान खानचा फर्स्ट लूक समोर येताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एका चाहत्याने 'डेविल आफ्टर अलेक्झांडर' असं लिहिलं आहे. दुसऱ्या एका चाहत्याने 'आयकॉनिक बॅकपोज' असं लिहिलंय. आणखी एका चाहत्याने लिहिलंय की, 'खरा शो आता सुरू होणार आहे, कारण आता डेविल येणार आहे'. इतर चाहत्यांनी पोस्टचा कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजीसह भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'किक 2' हा सलमान खानच्या 2014 मध्ये आलेल्या 'किक' चित्रपटाचा सीक्वेल आहे. 'किक' हा नाडियादवाला यांनी दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा गाठला आणि हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
सध्या सलमान खान एआर मुरुगदासच्या 'सिकंदर' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतला आहे आणि या चित्रपटात काजल अग्रवालही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'सिकंदर 2025' च्या ईदला रिलीजसाठी सज्ज होत आहे.