ETV Bharat / entertainment

मुंबई विमानतळावरील सलमान खानचा छोट्या मुलांना शेकहॅन्ड करतानाचा व्हिडिओ व्हायरल - सलमान खान

Salman Khan Airport Video: अभिनेता सलमान खानचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो दोन छोट्या मुलांना शेकहॅन्ड करताना दिसत आहे.

सलमान खान विमानतळ व्हिडिओ
Salman Khan Airport Video
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 10:51 AM IST

मुंबई- Salman Khan Airport Video: भाईजान सलमान खान कुठेही गेला तरी चाहते त्याला घेरतात. सलमान खानची स्टाईल अशी आहे की प्रत्येकजण त्याच्यावर फिदा होतात. सलमान खान त्याच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही. सलमान नुकताच मुंबईत परतला असून विमानतळावर तो वेगळ्याच अंदाजात दिसला. भाईजानचा मुंबई विमानतळावरील हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सलमानचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये सलमाननं विमानतळावर चाहत्यांची भेट घेऊन त्यांना शेकहॅन्ड केलं.

सलमान खाननं घेतली मुलांची भेट : सलमान खान काही दिवसांपूर्वी दुबईत होता. तो भाऊ सोहेल खानच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये गेला होता. आता सलमान भारतात परतला आहे. विमानतळावरच्या या व्हिडिओमध्ये सलमान दोन मुलांना स्वतः त्याच्या जवळ जाऊन शेकहॅन्ड करताना दिसत आहे. सलमानला भेटल्यानंतर व्हिडिओतील मुलं खूप आनंदी दिसत आहेत. दरम्यान भाईजानचा एअरपोर्ट लूक खूपच वेगळा आहे. त्यानं डेनिम आणि ब्लॅक टी-शर्टसह ऑलिव्ह कलरचा शर्ट घातला आहे. याबरोबर त्यानं लूकला आणखी विशेष बनविण्यासाठी टोपी घातली आहे.

सलमान खाननं केले कौतुक : सलमान खानच्या या व्हिडिओवर अनेकजण खूप कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओवर चाहते सलमानला प्रेमळ असल्याचं म्हणत आहे. काहीजण व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटी 'टायगर 3' मध्ये दिसला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 'टायगर 3'मध्ये सलमानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. सलमानचा हा चित्रपट अनेकांना आवडला होता. पुढं तो 'द बुल' 'दबंग 4', 'किक 2' आणि 'टाइगर वर्सेस पठाण' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 'टाइगर वर्सेस पठाण'मध्ये त्याच्याबरोबर शाहरुख खान देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. गझल हृदयाला भिडवणारा 'रुहानी' आवाजाचे पंकज उधास यांचं निधन, 'या' गाण्यांमुळं मिळाली अलोट प्रसिद्धी
  2. अमिताभ बच्चनची कारकीर्द उजवळणारे मनमोहन देसाई, 23 पैकी 15 चित्रपट ब्लॉकबस्टर बनवणार निर्माता
  3. सिद्धार्थ मल्होत्राने नवीन पोस्टरसह 'योद्धा' चित्रपटाच्या ट्रेलरची वाढवली उत्कंठा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.