ETV Bharat / entertainment

कडक सुरक्षेत 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचला सलमान खान, जड अंतःकरणाने म्हणाला, 'मुझे आज आना ही नहीं था' - SALMAN KHAN ON BIGG BOSS 18

इच्छा नसतानाही सलमान खान 'बिग बॉस 18' मध्ये परतला आहे. 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये स्पर्धक शिल्पा शिरोडकरशी बोलताना तो खूप इमोशनल झाला होता.

Salman Khan
सलमान खान ((Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 19, 2024, 5:11 PM IST

मुंबई - हिंदी सिनेमाचा सुपरस्टार सलमान खानला मिळत असलेल्या धमक्यांमुळे फिल्म जगतात चिंतेचं वातावरण तयार झालंय. अलीकडेच फिल्म इंडस्ट्रीशी घनिष्ठ संबंध ठेवणारे आणि सलमानचे मित्र म्हणून परिचित असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या तणावाच्या स्थितीत सलमान खान कडक सुरक्षा व्यवस्थेत 'बिग बॉस 18' च्या सेटवर हजर राहिला होता.

'वीकेंड का वार' एपिसोडच्या नवीन प्रोमोमध्ये दिसणारा सलमान काहीसा नाराज दिसत आहे. शिल्पा शिरोडकरला सांगताना म्हणाला काही गोष्टी आपल्याला मनाविरुद्धही जाऊन कराव्या लागतात. जसं की आज मला यायलाच नाही पाहिजे होतं, पण प्रोफेशनल कमिटमेंट म्हणून येणं भाग पडलं. हे म्हणत असताना सलमानचा रोख सध्या घडणाऱ्या घडामोडींकडे होता. कारण त्याला कडक सुरक्षेमध्ये या सेटपर्यंत यावं लागलं होतं.

सलमानने शिल्पाबरोबरच्या गप्पा मारताना जबाबदारीच्या दबावाचा संदर्भ दिला आणि तिला घरातल्या भावना हाताळण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, "मला अश्रूंचा तिरस्कार आहे, शिल्पा. आपकी बच्ची खाने पर गुस्सा उतरती थी, आप क्या बोलती थी उसे?" ज्यावर शिल्पाने प्रतिक्रिया दिली की, "खाने पर गुस्सा नहीं था, वृत्ती पे गुस्सा था." त्यानंतर सलमान पुढे म्हणाला, "तो हमारे वृत्ती पर गुस्सा निकलो. भावना से कोई रिश्ता आपके इस घर में होना ही नहीं चाहिये. जैसे की आज की मेरी ये भावना है की मुझे आज यहाँ पर आना ही नहीं था. एक आदमी को ना चाहते हुए उससे करना पडता है." त्याच्या सल्ल्यावरून शिल्पाला अश्रू अनावर झाले आणि हा भाग खूप भावूक झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानने 18 ऑक्टोबर रोजी बिग बॉस शोचे शूटिंग नेहमीपेक्षा काही तास उशिराने सुरू केले. लंचनंतर 4 वाजता ठरलेलं हे शूटिंग संध्याकाळी 7 वाजता सुरू झालं. या शोमध्ये लाफ्टर शेफ स्टार्स कृष्णा अभिषेक आणि सुदेश लाहिरी खास उपस्थित राहणार आहेत. ते दोघंही सलमानबरोबर बिग बॉस शोमध्ये मजा मस्ती करताना दिसणार आहेत.

बिग बॉसच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी सलमान खान वाय प्लस सुरक्षेसह उफस्थित राहिला. त्याच्या सुरक्षेसाठी शूटींगदरम्यान 60 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. प्रॉडक्शन टीमने सर्व प्रवेशकर्त्यांची आधार कार्ड्सची पडताळणी केली. शूटिंग पूर्ण होईपर्यंत क्रू मेंबर्सना साइटवर राहण्याच्या सूचना देण्यासह कठोर उपायांची अंमलबजावणी करण्यात आली होती. वीकेंड का वार एपिसोड या वीकेंडला प्रसारित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.