ETV Bharat / entertainment

अनंत-राधिका प्री-वेडिंग फंक्शनसाठी सलमान खान रणबीर, आलिया आणि धोनीसह इटलीला रवाना - Anant Radhika Pre Wedding - ANANT RADHIKA PRE WEDDING

Anant Radhika Pre Wedding : मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा इटलीमध्ये प्री-वेडिंग सोहळा पार पडणार आहे. यासाठी भारतातून अनेक सेलेब्रिटीसह सलमान खान, रणबीर कपूर आणि महेंद्र सिंग धोनी इटलीला रवाना झाले आहेत.

Anant Radhika Pre Wedding
अनंत-राधिका प्री-वेडिंग ((IMAGE - IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 10:54 AM IST

मुंबई - Anant Radhika Pre Wedding : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा दिमाखात होणार आहे. अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग सोहळा इटलीत पार पडणार आहे. यासाठी काल रात्री सलमान खानसह अनेक स्टार्स इटलीला रवाना झाले आहेत. अनंत-राधिकाचा विवाहपूर्व सोहळा २९ मे रोजी क्रूझवर साजरा होणार आहे.

सलमान खानसह 'हे' स्टार्स इटलीला रवाना - या सोहळ्यात सामील होण्यासाठी सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि 'जवान' या मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली काल रात्री इटलीला रवाना झाले आहेत. दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आपली मुलगी राहा कपूरबरोबर इटलीला रवाना झाले. या जोडप्याला त्यांच्या मुलीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. या भव्य दिव्य सोहळ्याला 800 पाहुण्यांशिवाय 600 हॉस्पिटॅलिटी कर्मचारीही उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येतं.

रणवीर सिंग त्याची प्रेग्नंट स्टार पत्नी दीपिका पदुकोणला घरी सोडून इटलीला रवाना झाला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि अंबानी कुटुंबही इटलीला रवाना झाले आहेत. त्याचवेळी हे सर्व सेलिब्रिटी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले आहेत. या जोडप्यानं 19 जानेवारी 2023 रोजी मुंबईत एंगेजमेंट केली होती. राधिका मर्चंट एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची मुलगी आहे.

अनंत आणि राधिका १२ जुलैला लग्न करणार आहेत. याआधी पार पडलेल्या या जोडप्याचा जामनगर येथे प्री वेडिंग सोहळ्यात मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी, बॉलिवूडचे तिन्ही खान शाहरुख, सलमान आणि आमिर खान पोहोचले होते. मुकेश अंबानी यांनी पॉप स्टार रिहानाला त्यांच्या मुलाच्या लग्नाआधीच्या उत्सवात आमंत्रित केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांनी रिहानाला मानधन म्हणून 74 कोटी रुपये दिले होते.

हेही वाचा -

  1. 'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक, बाप लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू - IPL 2024 Final
  2. आमिरचा मुलगा ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, जाणून घ्या जुनेद खानचा 'महाराजा' कधी आणि कुठे होणार रिलीज - Junaid Khan OTT debut
  3. कार्तिक आर्यन आणि करण जोहरचा 'दोस्ताना 2' का बंद झाला, आता समोर आलं खरं कारण - Dostana 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.