ETV Bharat / entertainment

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan

Salman Khan Death Threats : सलमान खानच्या वांद्रे येथील घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्यानंतर आता त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. अभिनेत्याला आजतागायत पाचवेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

Salman Khan Death Threats
सलमान खान जीवे मारण्याची धमकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 11:32 AM IST

मुंबई - Salman Khan Death Threats : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुपरस्टार सलमान खानचं नाव आघाडीवर आहे. गेल्या वर्षी 'भाईजान'ला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर त्याची सुरक्षा वाढविण्यात आली. त्याला आता कडक सुरक्षेत ठेवले जात आहे. त्याच्याकडे बुलेटप्रूफ निसान एसयूव्हीही कार आहे. इतकेच नाही तर त्याला राज्य सरकारनं त्याला वॉय प्लस (Y+) श्रेणीची सुरक्षाही दिली आहे. तरीही त्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानं चिंता व्यक्त होत आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमान खानला ठार मारण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे सलमाला कुठे जाण्यापूर्वी खूप विचार करावा लागतो. सलमानला कशामुळे धमकी मिळाली? कधी धमकी मिळाली, हे जाणून घेऊ.

काय आहे प्रकरण : 1998 मध्ये, सलमान राजस्थानमध्ये सूरज बडजात्याच्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी सलमाननं काळ्या काळविटाची शिकार केली होती. काळ्या काळवीटाला बिश्नोई समाज पवित्र मानतात. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.

लॉरेन्स बिश्नोईनं दिली धमकी : 2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईनं 'भाईजान'ला मारण्याची धमकी दिली होती. त्यानं सलमानला आव्हान देत म्हटलं होत की, 'आम्ही सलमान खानला जोधपूरमध्ये कोर्टात हजर राहिल्यानंतर लगेच मारून टाकू' असं वक्तव्य केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई हा खूप चर्चेत आला होता. याशिवाय काही महिन्यांपूर्वी, पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील अजेश कुमार गिला आणि गुरुसेवक सिंग शीख या दोन लोकांविरुद्ध पनवेल ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पनवेलच्या वाढे गावात सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये या आरोपींनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली.

सिद्धू मूसवालाच्या मृत्यूनंतर सलमान आल्या धमक्या : मे 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतरच सलमान खान आणि त्याचे वडील सलीम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. जूनमध्ये, वांद्रे येथे सलीम खान यांना एका बाकावर पत्र सापडले. तिथे ते सकाळी जॉगिंगनंतर बसायचे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं कथितपणे हत्या केलेल्या पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्यासारखेच नशीब सलमान आणि त्याच्या वडिलांचे होईल, असं या पत्रात लिहिलं गेलं होतं.

सलमानला ई-मेलद्वारे धमकी: मार्च 2023 मध्ये 'भाईजान'ला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. सलमानच्या जवळच्या व्यक्तीला एक ई-मेल आला होता. यामध्ये तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत होती. यामध्ये त्यानं सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील एकमेव ध्येय असल्याचं म्हटलं होतं. यानंतर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, मुंबई पोलिसांनी सलमान खानला धमकीचे ई-मेल पाठवल्याबद्दल गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सलमानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविली.

सलमानला कॉलद्वारे आणखी धमकी: 2023 मध्येच, सलमान खानला पुन्हा एकदा राजस्थानच्या जोधपूरमधील एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. हा माणूस 'गोरक्षक' होता. त्यानं 30 एप्रिल रोजी सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 10 एप्रिल रोजी फोन करणाऱ्यानं स्वत:ची ओळख जोधपूर येथील 'रॉकी भाई' अशी करून दिली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, फोन करणाऱ्याचा ठावठिकाणा शोधला. पोलिसांनी ठाणे, मुंबई येथून एका 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं. यानंतर मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, तो मुलगा राजस्थानचा रहिवासी असून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत होता.

सलमान खानला फेसबुक अकाउंटवरून धमकी: नोव्हेंबर 2023 मध्ये सलमानला पुन्हा एकदा धमकी मिळाली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं सलमानला फेसबुक अकाउंटवरून धमकी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ही पोस्ट पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालला उद्देशून केली होती. यात 'भाईजान'लाही इशारा देण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, सीसीटीव्हीवरून पोलिसांचा तपास सुरू - Salman Khan
  2. 'बेबी जॉन' ऐवजी, 'कल्कि 2898 एडी' होऊ शकतो रिलीज, जाणून घ्या कारण... - Baby John Postponed
  3. सोनू सूदनं शूज चोरी करणाऱ्या स्विगी डिलिव्हरी बॉयचा केला बचाव, युजर्सनं केलं ट्रोल - SONU SOOD

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.