ETV Bharat / entertainment

लॉरेन्स बिश्नोईच्या जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खाननं दुबईमध्ये 'दा बँग' टूरची केली घोषणा - LAWRENCE BISHNOI DEATH THREATS

सलमान खाननं 'दा-बॅंग' टूरची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यामातून केली आहे. आता 'भाईजान' कडक सुरक्षेत दुबईमध्ये धमाल करताना दिसेल.

salman khan
सलमान खान (सलमान खान Da-Bangg Tour (Da-bangg Tour Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 27, 2024, 1:07 PM IST

मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खानला बिश्नोई टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानचे वडील सलीम खान यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. 'भाईजान' आता देखील 'बिग बॉस 18' चे शूटिंग करत आहे. अलीकडेच सलमाननं 'दा-बॅंग टूरची घोषणा केली आहे. याचे पोस्टर त्यानं त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. याच्या कॅप्शन त्यानं लिहिलं, 'दुबई 'दा-बँग द' टूरसाठी तयार व्हा. 7 डिसेंबर 2024 रोजी पुन्हा रीलोड केले जाईल.' या 'दा बँग द' टूरमध्ये सलमान खानबरोबर सोनाक्षी सिन्हा, दिशा पटानी, तमन्ना भाटिया आणि जॅकलिन फर्नांडिस या सेलिब्रिटीज सामील होणार आहे.

सलमान खाननं केली 'द-बॅंग' टूरची घोषणा : याशिवाय कोरियोग्राफर प्रभुदेवा, मनीष पॉल, आस्था गिल आणि कॉमेडियन सुनील ग्रोव्हर देखील या शोचा भाग असणार आहेत. शेअर केलेल्या पोस्टवर असं नमूद करण्यात आलं आहे की, हा शो 4 तासांपेक्षा जास्त काळ चालेल. यामध्ये नॉन-स्टॉप डान्स, म्युझिक आणि मस्ती असेल. आयुष्यात अनेक धोके असताना, 'भाईजान' चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी धाडसी पावले उचलत आहे. सलमान खानचा जवळचा मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखीच बिघाड झाला आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीनं घेतली आहे.

'भाईजान'च्या सुरक्षेत वाढ : सलमान खानलाही लॉरेन्स बिश्नोईकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. आता 'भाईजान'च्या सुरक्षेत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या निवासस्थानीही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या सलमान हा 'बिग बॉस 18' च्या शूटिंगमध्ये सध्या व्यग्र आहे. दरम्यान सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'सिकंदर' या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 2025च्या ईदला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'सिकंदर'ची निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगादास करत आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 18' मधून मुस्कान बेघर, अविनाश आणि करणवीरचा सलमाननं घेतला क्लास
  2. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खाननं बिश्नोई समुदायाला धनादेश देऊ केला? काय आहे प्रकरण जाणून घ्या...
  3. सलमान खानला धमकी देणाऱ्याची टरकली; माफी मागत म्हणाला....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.