मुंबई - Salman Khan and Sanjay Dutt son Shahraan : हिंदी चित्रपटसृष्टीचा दबंग सलमान खान सध्या मुंबईतील त्याच्या घराच्या बाहेर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. अलीकडेच या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली गेली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर 'भाईजान' चांगलाच मूडमध्ये आहे. सलमान काही दिवसापूर्वी दुबईमधील कराटे कॉम्बॅट इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात तो संजय दत्तचा मुलगा शहरानबरोबर दिसला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात सलमान हा शहरानबरोबर फायटर शाहजेब रिंदची ओळखी करून देताना दिसत आहे.
सलमान खानचा व्हिडिओ झाला व्हायरल : हा व्हिडिओ फायटर शाहजेब रिंदनं त्याच्या सोशल मीडिया अकउंटवर आज 21 एप्रिल रोजी शेअर केला आहे, ज्यात भाईजान खूप खुश दिसत आहे. व्हिडिओमध्ये सलमान हा हसत हसत सर्वांबरोबर संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बिग बॉस फेम अब्दू रोझिक हा देखील फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फायटर शाहजेब यानं लिहिलं, 'सलमान खान, तुला लहानपणापासून पाहतोय. बॉससमोर लढणे हा सन्मान होता. लव्ह यू भाईजान.' सलमान खानचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओवर अनेकजण दबंग खानला काळजी घेण्यास सांगत आहेत.
सलमान खान झाला विमानतळावर स्पॉट : सलमान हा रविवारी मुंबई विमातळावर कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी तो अतिसुरक्षेत असल्याचा दिसला. काळ्या टी-शर्ट आणि पांढऱ्या पँटमध्ये सलमान खान नेहमीप्रमाणेच स्मार्ट दिसत होता. त्यानं या लूकला आणखी खास बनविण्यासाठी काळ्या रंगाचा सनग्लास लावला होता. दरम्यान सलमाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर , तो साजिद नाडियादवाला आणि ए.आर मुरुगादास यांच्याबरोबर आगामी 'सिकंदर' चित्रपटामध्ये दिसणार आहे हा ॲक्शन एंटरटेनर चित्रपट 2025 मध्ये ईदला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. याशिवाय तो 'इन्शाअल्लाह', 'वॉन्टेड 2', 'नो एन्ट्री 2', 'किक 2' आणि 'दबंग 4' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- शाहरुख खानची लेक सुहाना खाननं तिच्या इटली व्हेकेशनमधील फोटो केले शेअर - Suhana Khan share pics
- 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एपिसोडमध्ये विकी कौशल आणि सनी कौशलनं केली धमाल - Vicky Kaushal and Sunny Kaushal
- ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं 17 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला कौटुंबीक फोटो - Aishwarya Rai and Abhishek Bachchan